दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाकडून जागतिक बुद्बिबळ विजेत्या डी.गुकेशचा विशेष कॅन्सलेशनद्वारे सन्मान
Posted On:
17 DEC 2024 9:10PM by PIB Mumbai
पणजी, 17 डिसेंबर 2024
जागतिक बुद्बिबळ अजिंक्यपद जिंकणाऱ्या भारताच्या गुकेश डी. या बुद्धिबळपटूच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाने एका विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन केले. गुकेशने फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद 2024 या स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून, सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनून इतिहास घडवला. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी गोवा येथे शुक्रवारी 13-12-2024 रोजी झालेल्या कार्यक्रमात विशेष कॅन्सलेशनचे प्रकाशन केले.

देशाला अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या गुकेश डी.याची असामान्य प्रतिभा, समर्पित वृत्ती आणि जिद्द याचा टपाल व्यवस्थेकडून गौरव करण्यासाठी हे विशेष कॅन्सलेशन प्रकाशित करण्यात आले.
यावेळी बोलताना अमिताभ सिंग म्हणाले,“गुकेशची कामगिरी ही लक्षावधी भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. या विशेष कॅन्सलेशनद्वारे त्याचा सन्मान करण्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा हा चिरंतन बहुमान असेल.”
"मुंबई परिमंडळ कार्यालयाच्या महाव्यवस्थापक जयती समाद्दार, छत्रपती संभाजीनगरचे पोस्टमास्टर जनरल अदनन अहमद, पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल आर. के. जायभाये, नवी मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी आणि महाराष्ट्र टपाल परिमंडळाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हे विशेष कॅन्सलेशन महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाच्या सर्व ब्युरोंमध्ये उपलब्ध असेल आणि टपाल संग्राहक आणि बुद्धिबळप्रेमी यांना ते घेता येईल.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2085472)
Visitor Counter : 55