नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई बंदर प्राधिकरणाने मोफत मार्गदर्शित टूर्ससह सागरी वारशाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले


मुंबई बंदराचा दडलेला  सागरी वारसा प्रथमच जाणून घ्या!

टूर्स  सर्वसमावेशक असून  वृद्ध, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सुलभ

Posted On: 13 DEC 2024 3:11PM by PIB Mumbai


मुंबई  13 डिसेंबर, 2024

द हेरिटेज प्रोजेक्ट ही ना-नफा तत्वावर चालणारी संस्था आणि मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन  यांच्या सहकार्याने मुंबई बंदर प्राधिकरण  मुंबई बंदराच्या मोफत मार्गदर्शित टूरद्वारे जनतेला  भारताचा सागरी वारसा जाणून घेण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे.  मुंबई बंदराने सात दिवसांसाठी हा फेरफटका खुला केला असून  सामान्य जनतेला  प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बंदराच्या अंतर्गत कामकाजाची प्रथमच माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. 14 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत नियोजित हा  आठवडाभर चालणारा कार्यक्रम असून याद्वारे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख बंदरांपैकी एकाचा इतिहास, परिचालन आणि महत्त्व याची  एक दुर्मिळ झलक पाहता येईल.

मुख्य तपशील:

तारखा: 14 ते 20 डिसेंबर 2024

कालावधी: प्रति गट  3 तास

सहभाग शुल्क: निःशुल्क

बॅच आकार: प्रति गट  90 सहभागी

वेळा:

14 ते 15 डिसेंबर: तीन गट (सकाळी 8:00-11:00, 11:30-2:30, दुपारी 3:00 - 6:00)

16 ते 20 डिसेंबर: दोन गट (सकाळी 8:00 - 11:00, दुपारी 3:00-6:00)

प्रवेशाचे ठिकाण: ग्रीन गेट, बॅलार्ड पिअर, मुंबई बंदर प्राधिकरण

या उपक्रमाचा उद्देश बंदर आणि  समुदायामधील अंतर कमी करणे, सहभागींना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याची आणि बंदराचे  ऐतिहासिक आणि परिचालन महत्त्व  जाणून  घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा  आहे. मार्गदर्शित टूर्स इतिहास, संस्कृती आणि आधुनिक बंदर कामकाज यांची सांगड घालत एक समृद्ध अनुभव देणार आहेत.  सहभागी महत्त्वाच्या खुणा शोधतील, मुंबईच्या सागरी परिवर्तनाच्या मनमोहक कथा जाणून घेतील आणि बंदर कामकाजाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतील.

या  टूरची रचना  सर्वसमावेशक अशी असून  वृद्ध, विशेष गरजा असलेल्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी अगदी सुलभ  आहेत.

मीडिया प्रश्न आणि आरक्षण संबंधी माहिती

मीडिया प्रश्नः मयंक मोहंती (+91 86307 49326, mayank@rpgf.in

आरक्षण : तेजा अमलादी (+91 98904 79757, teja@rpgf.in

मुंबई बंदर प्राधिकरण : 1873 मध्ये स्थापित, मुंबई बंदर प्राधिकरण हे एक महत्त्वपूर्ण व्यापार प्रवेशद्वार आहे आणि भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचा एक कणा आहे, जो कार्यक्षम सागरी परिचालनाद्वारे जागतिक व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देतो.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084194) Visitor Counter : 176


Read this release in: English