दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘महापेक्स 2025' येथे टपाल तिकिटांचा उत्सव साजरा करा: सहभागासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 16 डिसेंबरपर्यंत वाढवली !
महाराष्ट्र पोस्टल सर्कलने राज्यस्तरीय फिलाटेलिक प्रदर्शनासाठी (22 ते 25 जानेवारी) फिलाटेलिस्ट, नागरिकांना केले निमंत्रित
Posted On:
12 DEC 2024 6:15PM by PIB Mumbai
मुंबई, 12 डिसेंबर 2024
महाराष्ट्र पोस्टल सर्कलने महापेक्स 2025 या राज्यस्तरीय फिलाटेलिक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 16 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. हे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे होणार आहे.
महापेक्स 2025 प्रदर्शन आणि आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून टपाल तिकिटांच्या संग्रहाला प्रोत्साहन देईल आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करेल.
महापेक्स 2025 ची ठळक वैशिष्ट्ये:
- संकल्पना आधारित प्रदर्शन: इतिहास आणि वारसा, वनस्पती आणि प्राणी, सांस्कृतिक प्रवचन, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि इतर यावरील प्रदर्शने.
- विशेष फिलाटेलिक अनावरण : स्मृती शिक्के , पोस्टकार्ड आणि विशेष सादरीकरण पॅक .
- परस्परसंवादी सत्रे: प्रसिद्ध फिलाटेलिक तज्ञांबरोबर कार्यशाळा आणि चर्चासत्रे.
- छायाचित्रण स्पर्धा: सर्वांसाठी खुली.
- चित्रकला स्पर्धा: शालेय विद्यार्थी आणि प्रौढांसाठी स्वतंत्र श्रेणी.
या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल ने टपाल तिकीटांचा संग्रह करणारे तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि सामान्य जनतेला आमंत्रित केले आहे. प्रवेश अर्ज, सहभाग संबंधी मार्गदर्शक तत्त्वे आणि अधिक माहितीसाठी, www.mahapex2025.com किंवा ईमेल mahapex2025[at]gmail[dot]com ला भेट द्या.
महत्वपूर्ण तारखा आणि तपशील
- प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख: डिसेंबर 16, 2024
- प्रदर्शनाच्या तारखा: 22-25 जानेवारी 2025
- स्थळ: वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2083901)
Visitor Counter : 44