ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I प्रकल्पांचे  प्रमुख म्हणून कमलेश सोनी यांनी  स्वीकारला पदभार

Posted On: 07 DEC 2024 2:12PM by PIB Mumbai

 

एनटीपीसी  पश्चिम क्षेत्र- Iप्रकल्पांचे क्षेत्रिय कार्यकारी संचालक म्हणून कमलेश सोनी यांनी 6 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला. एनटीपीसीच्या मुंबईतली मुख्यालयात नियुक्ती झालेले सोनी पश्चिम विभागातल्या सोलापूर, मौदा, अंता, रत्नागिरी, कावस आणि झानोर गंधार या महत्त्वाच्या औष्णिक उर्जा प्रकल्पांच्या कामकाजावर देखरेख करतील.

सोनी यांनी 1987 मध्ये  एनटीपीसीतल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या 36 वर्षांच्या कारकिर्दीत उर्जा प्रकल्पाच्या कामकाजाचा व प्रकल्प व्यवस्थापनाचा व्यापक अनुभव घेतला. या कालावधीत त्यांनी एनटीपीसी ऊंचाहार, गाडरवारा व मेजा इथल्या उर्जा प्रकल्पांचा प्रमुख म्हणून काम केले. या काळात त्यांची प्रकल्पाला चालना देण्याची क्षमता, वेळेत काम पूर्ण करण्याची हमी आणि एनटीपीसीची उद्दिष्टे  साध्य करणे हे गुणविशेष निदर्शनास आले.

सोनी यांच्या नेतृत्वात एनटीपीसी पश्चिम क्षेत्र -I चा भर सर्वोत्कृष्ट कामकाजासह रास्त दरातील शाश्वत उर्जा पुरवण्याच्या संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीला पाठबळ  देण्यावर  असेल. औष्णिक व नवीकरणीय दोन्ही प्रकारचे उर्जा प्रकल्प असलेले  हे क्षेत्र  म्हणजे एनटीपीसीच्या उर्जा रुपांतरण व शाश्वतता या व्यापक दृष्टीचा अविभाज्य भाग आहे.

एनटीपीसी  पश्चिम क्षेत्र I मध्ये औद्योगिक तसेच घरगुती वीज पुरवठा करणाऱ्या काही महत्त्वाच्या उर्जा निर्मिती कंपन्यांच्या प्रमुख ऊर्जा केंद्रांचा समावेश आहे. सोनी यांच्या नेतृत्वात एनटीपीसीची कार्यक्षमता आणखी वाढेल आणि देशाची भविष्यातली उर्जेची गरज पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

कामकाज व व्यवस्थापन, कार्यकारी सेवा या क्षेत्रांत सोनी निपुण आहेत. त्यांच्या या कौशल्यामुळे एनटीपीसीच्या पश्चिम क्षेत्रातल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व करण्यास ते अत्यंत सक्षम आहेत. विश्वासार्ह उर्जानिर्मिती, कार्यक्षमता वृद्धी व भारताच्या उर्जाविषयक गरजा पूर्ण करणे ही कंपनीची उद्दीष्टे साध्य करण्यात त्यांचा दीर्घकालिन अनुभव व धोरणात्मक नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावतील.

आपल्या नव्या जबाबदारीविषयी बोलताना सोनी म्हणाले, ''एनटीपीसीच्या पश्चिम क्षेत्र- प्रकल्पांचे  नेतृत्व करायला मिळणं माझ्यासाठी मोठी संधी आहे. देशाच्या औद्योगिक आणि अन्य क्षेत्रातील प्रगतीमध्ये या प्रदेशातल्या उर्जा प्रकल्पांचं योगदान उल्लेखनीय आहे. इथल्या बुद्धीमान सहकाऱ्यांसोबत काम करुन एनटीपीसीची सर्वोत्कृष्टता, नाविन्यपूर्णता व शाश्वततेची हमी ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल.''

***

S.Kakade/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2081960) Visitor Counter : 34


Read this release in: English