शिक्षण मंत्रालय
‘एनआयओएस’- राष्ट्रीय मुक्त शालेय शिक्षण विभागाने मार्च-एप्रिल 2025 साठी माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक परीक्षा केंद्रांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली
Posted On:
05 DEC 2024 8:53PM by PIB Mumbai
पुणे, 5 डिसेंबर 2024
एनआयओएस म्हणजेच राष्ट्रीय मुक्त शालेय शिक्षण संस्था वर्षातून दोनदा सार्वजनिक परीक्षा घेते. दरवर्षी एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एनआयओएस मुख्यालयाने निश्चित केलेल्या तारखांना या परीक्षा होतात. मार्च-एप्रिल 2025 सत्रासाठी एनआयओएसच्या माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी पुढील सार्वजनिक (सिद्धांत) परीक्षा एप्रिल 2025 च्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये, सरकारी/सरकारी अनुदानित/खाजगी शाळा/महाविद्यालये/सीबीएसई/आयसीएसई/राज्य मंडळे/विद्यापीठांशी संलग्न संस्थांमध्ये एनआयओएस परीक्षेच्या पोटनियमानुसार परीक्षा केंद्रे निश्चित केली जाणार आहेत. या संदर्भात, प्राचार्य/शाळा/महाविद्यालय प्रमुखांना ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती केली आहे. एनआयओएच्या वेबसाइटवर परीक्षा केंद्रांच्या नोंदणीसाठी URL https://exams.nios.ac.in ही लिंक आहे. तसेच परीक्षा केंद्रांचे निकष संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रदान केलेल्या लिंकवर बँक ‘अंडरटेकिंग प्रोफॉर्मा’ भरणे आणि अपलोड करणे आवश्यक आहे. मूळ केंद्रांचा स्वीकृती फॉर्म, बँकेच्या प्रोफॉर्मासह, पुण्यातील एनआयओएसच्या प्रादेशिक केंद्रांना संपूर्णपणे सादर करणे आवश्यक आहे. हे अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल 05.12.2024 ते 04.01.2025 पर्यंत खुले राहील. परीक्षा केंद्र निश्चितीच्या वेळी निकषांवर आधारित एनआयओएच्याद्वारे केंद्र नियुक्त केले जातील आणि या टप्प्यावर कोणत्याही शाळा/संस्थांना कोणतेही अधिकार किंवा प्राधान्य असणार नाही.
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2081322)
Visitor Counter : 32