अर्थ मंत्रालय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा 90 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आरबीआय90 ही देशव्यापी प्रश्नमंजुषा: राज्यस्तरीय फेरी, महाराष्ट्र
Posted On:
25 NOV 2024 9:05PM by PIB Mumbai
मुंबई, 25 नोव्हेंबर 2024
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यंदा आपल्या कामकाजाचे 90 वे वर्ष साजरे करत आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करण्यासाठी वर्षभर आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग म्हणून, बँकेने आरबीआय 90 क्विझ ही सामान्य ज्ञानावर आधारित देशव्यापी प्रश्नमंजुषा स्पर्धा पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी ठेवली आहे. आरबीआय90क्विझ ही एक संघ-आधारित स्पर्धा आहे, जी अनेक टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली.
याचा ऑनलाइन टप्पा 19-21 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. ऑनलाइन टप्प्यातील कामगिरीच्या आधारे, राज्यस्तरीय फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन संघांची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्रासाठी आरबीआय90क्विझची राज्यस्तरीय फेरी सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती, जिथे 120 विद्यार्थी (60 संघ) स्पर्धेत सहभागी झाले. प्रियांशु महर आणि उदय तेज सिंग यांचा समावेश असलेल्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथील संघ विजेता ठरला. त्यापाठोपाठ इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी, मुंबई आणि नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई हे संघ अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर राहिले. पहिल्या तीन संघांसाठी अनुक्रमे ₹2 लाख, ₹1.5 लाख आणि ₹1 लाखांची बक्षिसे होती. विजेते संघ इंदूर येथे 3 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या विभागीय फेरीत भाग घेतील. राष्ट्रीय अंतिम फेरी डिसेंबर 2024 मध्ये मुंबई येथे होणार आहे.

N.Chitale/N.Mathure/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2077130)
Visitor Counter : 46