वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एप्रिल – ऑक्टोबर 2024 या काळात एकूण निर्यात अंदाजे 468.27 अब्ज अमेरिकी डॉलर्स, एप्रिल – ऑक्टोबर 2023 या काळातील 436.48 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 7.28% वाढ
Posted On:
14 NOV 2024 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2024
भारताची एकूण निर्यात (वाणिज्य आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 73.21 अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023च्या तुलनेत 19.08% सकारात्मक वाढ आहे. भारताची एकूण आयात (वाणिज्य आणि सेवा मिळून) ऑक्टोबर 2024* मध्ये सुमारे 83.33अब्ज अमेरिकी डॉलर असून ही ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत 7.77% सकारात्मक वाढ आहे.
|
October 2024
(USD Billion)
|
October 2023
(USD Billion)
|
Merchandise
|
Exports
|
39.20
|
33.43
|
Imports
|
66.34
|
63.86
|
Services*
|
Exports
|
34.02
|
28.05
|
Imports
|
17.00
|
13.46
|
Total Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
73.21
|
61.48
|
Imports
|
83.33
|
77.33
|
Trade Balance
|
-10.12
|
-15.85
|
भारताची एप्रिल – ऑक्टोबर 2024* या काळात एकूण निर्यात अंदाजे 468.27 अब्ज अमेरिकी डॉलर असून एप्रिल – ऑक्टोबर 2023 या काळातील 436.48 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 7.28% सकारात्मक वाढ आहे. एप्रिल – ऑक्टोबर 2024* या काळात एकूण आयात अंदाजे 531.51अब्ज अमेरिकी डॉलर असून आयातीत 7.05% वाढीची नोंद झाली आहे.
वाणिज्य व्यापार
ऑक्टोबर 2024 मध्ये वाणिज्य मालाची निर्यात 39.20 अब्ज अमेरिकी डॉलर; तर ऑक्टोबर 2023 मध्ये 33.43 अब्ज अमेरिकी डॉलर होती.
ऑक्टोबर 2024 मध्ये वाणिज्य मालाची आयात 66.34 अब्ज अमेरिकी डॉलर; तर ऑक्टोबर 2023 मध्ये 63.86 अब्ज अमेरिकी डॉलर होती.
एप्रिल-ऑक्टोबर 2024 या काळात वाणिज्य मालाची निर्यात 252.28 अब्ज अमेरिकी डॉलर; तर एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 244.51 अब्ज अमेरिकी डॉलर होती.
एप्रिल-ऑक्टोबर 2024 या काळात वाणिज्य मालाची आयात 416.93 अब्ज अमेरिकी डॉलर; तर एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 394.18 अब्ज अमेरिकी डॉलर होती.
वाणिज्य व्यापारातील तूट एप्रिल-ऑक्टोबर 2024 या काळात 164.65 अब्ज अमेरिकी डॉलर; तर एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 149.67 अब्ज अमेरिकी डॉलर होती.
सेवा व्यापार
सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य ऑक्टोबर 2024* मध्ये 34.02 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून ऑक्टोबर 2023 मध्ये ते 28.05 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.
सेवा आयातीचे अंदाजे मूल्य ऑक्टोबर 2024* मध्ये 17 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून ऑक्टोबर 2023 मध्ये ते 13.46 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.
सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य एप्रिल-ऑक्टोबर 2024* या काळात 215.98 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये ते 191.97 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.
सेवा आयातीचे अंदाजे मूल्य एप्रिल-ऑक्टोबर 2024* या काळात 114.57 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये ते 102.32 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.
सेवा व्यापार अधिशेष एप्रिल-ऑक्टोबर 2024* या काळात 101.41 अब्ज अमेरिकी डॉलर इतका असून एप्रिल-ऑक्टोबर 2023 मध्ये 89.64 अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता.
* झटपट अंदाज जाणून घेण्यासाठी लिंक
S.Kane/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2073340)
Visitor Counter : 39