माहिती आणि प्रसारण मंत्रालय
चित्रपटीय वैविध्याचा उत्सव
इफ्फीमध्ये स्थानिक आणि जागतिक कथांचा मेळ
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2024
अनेकानेक संस्कृती, कहाण्या आणि कलात्मक शोधांचे दर्शन घडवणाऱ्या प्रादेशिक तसेच जागतिक चित्रपटांच्या सुसंवादी मिश्रणाचे दर्शन घडवत भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा चित्रपट विषयक उत्कृष्टतेचा दीपस्तंभ ठरतो आहे. स्थानिक मातीशी घट्ट राहत जागतिक पातळीवर प्रशंसा आणि कौशल्य कसे प्राप्त करावे याचे इफ्फी हे उत्तम उदाहरण आहे. कला आणि हस्तकौशल्य यांचा उत्सव साजरा करण्यासाठी जगभरातील चित्रपट, कलाकार आणि प्रेक्षक एकत्र येण्याचे इफ्फी हे महत्त्वाचे स्थळ ठरत आहे. इफ्फी म्हणजे देशादेशांमधील सीमारेषा ओलांडणारी सार्वत्रिक भाषेच्या रुपात चित्रपटांमध्ये असलेल्या सामर्थ्याचा आनंदी सोहोळा असून हा महोत्सव जगभरातील चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांना एकत्र आणतो.
इफ्फीची एकंदर रचना या महोत्सवाला स्थानिकांना जागतिक बाबींशी जोडणारा सेतू बनवते हे पाहणे मनोरंजक आहे. खोलवर रुजलेला पोर्तुगीज वारशासाठी सुप्रसिध्द असणाऱ्या तसेच 17 व्या शतकातील चर्चेसचे आणि आजूबाजूच्या उष्णकटिबंधीय मसाल्यांच्या पिकांच्या लागवडीचे सुरेख पद्धतीने जतन करणाऱ्या गोवा शहरात हा इफ्फीचा सोहळा पार पडतो. गोव्याच्या समाजजीवनात मिसळून गेलेल्या बहु-संस्कृतींचे वस्त्र, सर्व संस्कृतींना समान आदर देण्याची शिकवण देत तेजाने चमकते.
आकडेवारी असे सांगते की जेथे वैविध्याची कदर केली जाते असा मंच म्हणून इफ्फीचे स्थान आहे. यावर्षी 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे होणाऱ्या 55 व्या इफ्फीमध्ये जागतिक पातळीवरील सहभाग दिसून येणार असून यावर्षी जगातील 101 देशांमधून 1,676 अर्ज सादर करण्यात आले असून, या महोत्सवात 81 देशांतील 180 हून अधिक चित्रपट सादर होणार आहेत. ही आकडेवारी इफ्फीच्या विस्तारत जाणाऱ्या जागतिक पदचिन्हांचे ठळकपणे दर्शन घडवते तसेच विविध चित्रपटीय परंपरांच्या दरम्यानचा सेतू म्हणून भूमिका अधोरेखित करते. त्याचवेळी, कलेच्या भरभराटीसाठी संस्कृती मिश्रणाची परिसंस्था उभारत या महोत्सवात चित्रपटाच्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या बहुविध स्थानिक भाषांतील चित्रपट देखील दिसणार आहेत.
क्षेत्रीय चित्रपटांच्या कैवारी म्हणून इफ्फीची अनोखी भूमिका अधोरेखित करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे भारतीय पॅनोरमा विभाग. या विभागासाठी निवडण्यात आलेल्या बहुविध स्थानिक भाषांतील चित्रपटांतून या विभागाचे वैविध्य दिसून येते.यावर्षी या विभागासाठी निवड झालेल्या 25 फिचर चित्रपटांमध्ये तीन मराठी, पाच हिंदी, दोन कन्नड, एक तमिळ, दोन तेलुगु, एक गुजराती, तीन आसामी, चार मल्याळी, तीन बंगाली आणि एका गलो चित्रपटाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नॉन-फिचर विभागात सादर होणाऱ्या 20 चित्रपटांपैकी एक मराठी, सात हिंदी, दोन तमिळ, एक बंगाली,एक हरियाणवी, एक गारो, एक पंजाबी, एक लडाखी, एक ओरिया, एक तमिळ, एक इंग्लिश, एक राजस्थानी आणि एक कोंकणी चित्रपट आहे. निवड झालेले हे चित्रपट म्हणजे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीची प्रतिकृती सादर करत, भारतात अस्तित्वात असलेल्या असंख्य कथाकथनाच्या परंपरांचा पुरावाच आहे.
या महोत्सवात स्थानिक आणि जागतिक चित्रपट उद्योगांचे एकत्रीकरण दिसून येत असल्याने या महोत्सवात सह-निर्माणाची बाजारपेठ या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मिश्रणाला बळकटी देते. सात देशांतील 21 फिचर चित्रपट आणि 8 वेब मालिकांची सहनिर्मिती बाजार विभागातील सादरीकरणासाठी अधिकृत निवड झाली असून यात मराठी, हिंदी, इंग्रजी, आसामी, तमिळ, मारवाडी, बंगाली, मल्याळी, पंजाबी, नेपाळी, पहाडी आणि कॅन्टोनीज या भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. या निवडीतून, प्रादेशिक आणि जागतिक कथाकथनाचे मिश्रण करणाऱ्या सहयोगी तसेच सांस्कृतिकदृष्ट्या समावेशक चित्रपटीय वातावरणाची जोपासना करण्याप्रती इफ्फीची समर्पित वृत्तीचे उदाहरण दिसून येते.
त्याचप्रमाणे, इफ्फी 2024 मधील चित्रपट बाजारातील वर्क-इन-प्रोग्रेस (डब्ल्यूआयपी) लॅब उपक्रमातून या उत्सवाची चित्रपट क्षेत्रातील नव्या प्रतिभांची जोपासना करण्याप्रती कटिबद्धता दिसते. या विभागासाठी निवडण्यात आलेल्या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ बादी यांचा उमल (मराठी), त्रिवेणी राय यांचा शेप ऑफ मोमोज (नेपाळी), शक्तीधर बीर यांचा गांगशालिक (गांगशालिक- रिव्हर बर्ड) (बंगाली) मोहन कुमार वालासला यांचा येरा मांडरम (द रेड हिबिस्कस) (तेलुगु), रिधम जानवे यांचा काट्टी री राट्टी (हंटर्स मून) (गड्डी,नेपाळी), विवेक कुमार यांचा द गुड,द बॅड, द हंग्री (हिंदी) यांचा समावेश आहे. यापैकी पाच चित्रपट पदार्पणातील चित्रपट असून त्यातून युवा चित्रपट निर्मात्यांची अमर्याद क्षमता आणि अभिनव दृष्टी ठळकपणे दिसते. लॅबच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा मिश्र मार्गदर्शन नमुन्यामुळे महत्त्वाचे अभिप्राय मिळणे सुलभ होऊन या चित्रपट निर्मात्यांना प्रादेशिक अस्सलपणा आणि जागतिक आवाहन अशा दोन्ही बाबतीत त्यांचे प्रकल्प परिष्कृत करणे शक्य होणार आहे.
याशिवाय, इफ्फी 2024मध्ये ऑस्ट्रेलियाला कंट्री ऑफ फोकस “लक्ष केंद्रित करण्यात आलेला देश” हा सन्मान देण्यात आला असून यातून या महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्वरूप अधिक ठामपणे सादर करण्यासोबतच भारत-ऑस्ट्रेलिया दृक श्राव्य सह-निर्मिती कराराच्या माध्यमातून सामायिक कथा कथनाच्या परंपरा देखील अधोरेखित होणार आहेत. दोन संस्कृतींदरम्यानच्या संवादावर देण्यात आलेला हा भर इफ्फीला केवळ महोत्सव या स्वरूपाच्या पलीकडे घेऊन जातो- इफ्फी हा चित्रपटांचा उत्सव साजरा करण्यासाठी जेथे वेगवेगळे आवाज एकत्र येतात अशा जागतिक कथांच्या संमेलनाचा मंच आहे हे दिसून येते.
अशा विस्तृत जागतिक आणि प्रादेशिक सहभागासह, इफ्फी 2024 हा महोत्सव कलात्मक देवाणघेवाणीसाठीचा स्तंभ म्हणून ठाम उभा असून चित्रपट हे क्षेत्र देशांच्या सीमांच्या पल्याड संपर्कासाठी सेतू म्हणून कसा कार्य करेल याचे दर्शन घडवतो आहे. उदयोन्मुख आणि अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपट निर्मात्यांन प्रोत्साहित करत स्थानिक अस्सलपणा आणि आंतरराष्ट्रीय सहयोग यांच्या मिश्रणासाठी सुलभता निर्माण करत इफ्फी हा महोत्सव जगभरातील चैतन्याने रसरसलेल्या कथांचा उत्सव साजरा करणारे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र ही भूमिका ठामपणे निभावतो आहे.
References
https://iffigoa.org/
https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2022/dec/doc2022122139601.pdf
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1975005#:~:text=The%20Ministry%20of%20Information%20%26%20Broadcasting,28%20Nov%2C%202023%20at%20Goa
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2068120
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2067309
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2067711
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2054935
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2071092
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2070594
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2071460
Click here to see PDF.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2072578)
Visitor Counter : 41