अर्थ मंत्रालय
डीआरआय ने सोन्याच्या तस्करीचा प्रयत्न हाणून पाडत 9.487 किलो सोने केले जप्त
Posted On:
24 OCT 2024 7:09PM by PIB Mumbai
मुंबई, 24 ऑक्टोबर 2024
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गोपनीय माहितीनुसार कारवाई करत जयपूरहून मुंबईला येणाऱ्या विमान IX 1762 मधून दोन प्रवाशांना तपासणीसाठी अडवले. त्यांच्या सामानाची तपासणी केल्यावर, अधिकाऱ्यांनी एकूण 9,487 ग्रॅम विदेशी सोन्याचे तीन पॅकेट जप्त केले. या सोन्याचे अंदाजे बाजार मूल्य 7.69 कोटी रुपये इतके आहे. प्रवासादरम्यान तस्करीच्या उद्देशाने सोने लपवून ठेवल्याचे आणि आपली खरी ओळख लपवून प्रवास केल्याचे या दोन प्रवाशांनी चौकशी दरम्यान मान्य केले. या कारवाईदरम्यान सोने जप्त करण्यात आले असून दोन्ही प्रवाशांना सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.


07BX.jpeg)
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2067869)
Visitor Counter : 47