संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विश्वासार्ह कृत्रिम प्रज्ञेचे(AI) महत्त्वाच्या संरक्षण कार्यांमध्ये एकात्मिकरण करण्याची चौकट आणि मार्गदर्शक तत्वांचे प्रकाशन

Posted On: 17 OCT 2024 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2024

सशस्त्र दलांसाठी  विश्वासार्ह कृत्रिम प्रज्ञा मूल्यमापन(ETAI) चौकट आणि मार्गदर्शक तत्वांचे संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान आणि संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी आज नवी दिल्लीत प्रकाशन केले. ईटीएआय चौकट आणि मार्गदर्शक तत्वे, विश्वासार्ह कृत्रिम प्रज्ञेचे महत्त्वाच्या संरक्षणविषयक कामकाजासोबत एकात्मिकरण करण्याच्या देशाच्या दृष्टीकोनातील मध्यवर्ती भूमिका प्रदर्शित करत आहेत.

यावेळी बोलताना संरक्षणदल प्रमुख अनिल चौहान यांनी विश्वासार्ह एआयचा वापर तातडीने करण्याची गरज अधोरेखित केली. आधुनिक युद्धतंत्रामध्ये एआय कशा प्रकारे क्रांती घडवत आहे हे सध्याच्या काळातील जागतिक संघर्षांनी दाखवून दिले असल्याकडे त्यांनी निर्देश केला. या प्रणाली आपल्या उद्देशानुसार काम करत आहेत की नाहीत हे सुनिश्चित करण्याबरोबरच आपल्या शत्रूपक्षाकडून  होणाऱ्या हल्यांना तोंड देण्यामध्ये त्या सक्षम आहेत की नाहीत याची खातरजमा करणे अतिशय महत्त्वाचे असल्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी ईटीएआय चौकट विकसित केल्याबद्दल वैज्ञानिक विश्लेषण समूहाचे अभिनंदन केले आणि संरक्षणविषयक व्यवहार आणि उपक्रमांमध्ये एआयच्या विश्वासार्हतेत वाढ करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. विश्वासार्हता आणि भक्कमपणा हे आता पर्यायापुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर मोहीम अपयशी होऊ नये यासाठी आणि अनपेक्षित दुष्परिणाम टाळण्यासाठी या बाबी अनिवार्य आहेत, याकडे डीआरडीओ अध्यक्षांनी निर्देश केला. भविष्यातील मोहिमांच्या यशस्वितेसाठी एआय प्रणाली भरवशाच्या, भक्कम, पारदर्शक आणि सुरक्षित  असल्या पाहिजेत, असे त्यांनी अधोरेखित केले.

ईटीएआय चौकट पाच व्यापक सिद्धांतांवर भर देत आहे.विश्वासार्हता आणि भक्कमपणा, सुरक्षा आणि संरक्षण, पारदर्शकता, निष्पक्षता आणि गोपनीयता हे ते सिद्धांत आहेत. त्याशिवाय विश्वासार्ह एआयचे मूल्यमापन करण्यासाठी सर्वसमावेशक निकषांचे  संच ते परिभाषित  करतात. या निकषांची पूर्तता करण्यासाठी ईटीएआय मार्गदर्शक तत्वे एआय पाईपलाईनमध्ये अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विशिष्ट उपाययोजना उपलब्ध करतात. ही चौकट आणि मार्गदर्शक तत्वे विकासक आणि मूल्यमापकांना विश्वासार्ह एआय निर्माण करण्यास आणि मूल्यमापन करण्यास एक संरचनात्मक दृष्टीकोन प्रदान करतात.  

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2065923) Visitor Counter : 51


Read this release in: English , Urdu , Hindi