मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

VAMNICOM आणि आयसीएआर-सीआयएफई यांनी महाराष्ट्रातील सागरी मत्स्यपालन सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी व्यापक कार्यक्रम केला सुरू

Posted On: 14 OCT 2024 5:00PM by PIB Mumbai

मुंबई, 14 ऑक्टोबर 2024

महाराष्ट्रातील मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या क्षमता वाढविण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न म्हणून, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) ने भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)- केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्था (CIFE) यांच्या सहकार्याने 11 ते 13 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विस्तारित कार्यक्रमांची मालिका आयोजित केली होती.या विकसित भारत व्याप्ती विस्तार कार्यक्रमात मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या दुर्बल घटकांतील, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाचे सदस्य, युवक आणि महिला मत्स्य सहकारी संस्थांनी लक्षणीय सहभाग घेतला होता.ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये मत्स्यपालन सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या महत्त्वाच्या उपक्रमांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात ठाणे जिल्हा मत्स्यपालन सहकारी महासंघात झाली. या कार्यक्रमात वॅमनिकॉम आणि आयसीएआर-सीआयएफई च्या प्राध्यापक सदस्यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4 जिल्ह्यांतील 34 मत्स्यपालन सहकारी संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सत्तरहून अधिक संचालक मंडळांसह सहभाग घेतला.मासेमारी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि सहकारी विकासाला समर्थन देण्यासाठी आरेखित करण्यात आलेल्या सरकारच्या मस्त्य संपदा योजना तसेच मत्स्योद्योग आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी यासह सरकारच्या प्रमुख सहकारी उपक्रमांबद्दल या कार्यक्रमात उपस्थितांना माहिती देण्यात आली.  

अर्नाळा मत्स्यव्यवसाय बहुउद्देशीय सहकारी संस्थेमध्ये झालेला व्याप्ती विस्तार कार्यक्रम विशेष ठरला. या कार्यक्रमाने मत्स्य व्यवसायातील 400 हून अधिक भागधारकांना आकर्षित केले होते. या कार्यक्रमाने बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था (MPACS) उपक्रमांसारख्या अलिकडेच सुरू झालेल्या उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान केली, ज्यामुळे सहकारी सदस्यांना उपलब्ध असलेल्या विविध संधींची अधिक माहिती मिळाली.

अशाच प्रकारचे व्याप्ती विस्तार कार्यक्रम इतर प्रमुख ठिकाणी आयोजित केले गेले.त्यात पुढील कार्यक्रम समाविष्ट होते:

  • मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था, कोळीवाडा, मुंबई : महिला मासळी सहकारी संस्थांद्वारे व्यवस्थापित सुक्या मासळी विक्रीवर आणि बाजार मूल्य साखळीवर लक्ष केंद्रित करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त महिला सहकारी संस्था.
  • वर्सोवा मत्स्यव्यवसाय बहुउद्देशीय सहकारी संस्था, वर्सोवा, मुंबई : व्याप्ती विस्तार कार्यक्रमा दरम्यान सामायिक केलेल्या माहितीचा या सहकारी संस्थेला देखील फायदा झाला.

या कार्यक्रमांनी भागधारकांना केवळ त्यांची कार्यशीलता वाढवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधनांनी सुसज्ज केले नाही तर मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील वाढ आणि शाश्वततेसाठी एकत्रित  दृष्टीकोन वाढवून सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार्याला प्रोत्साहन दिले.

व्याप्ती विस्तार उपक्रम म्हणजे वॅमनिकॉम आणि आयसीएआर-सीआयएफई तसेच सहकार मंत्रालयाच्या स्थानिक मत्स्यपालन सहकारी संस्थांना सक्षम बनवण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे, ज्यामुळे या समुदायांच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देताना त्याची स्पर्धात्मक बाजारपेठेत भरभराट होईल याची खात्री देखील होते. या व्याप्ती विस्तार कार्यक्रमाचे संयोजन वॅमनिकॉम चे सहयोगी प्राध्यापक डॉ. महेश कदम, मुंबईतील आयसीएआर-सीआयएफई चे डॉ. शिवाजी अरगडे आणि पुण्यातील वॅमनिकॉम चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित बोरकर यांनी केले होते.

 

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2064694) Visitor Counter : 52


Read this release in: English