अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाने अफूचा मोठा साठा जप्त करुन चौघांना केली अटक
Posted On:
11 OCT 2024 10:10PM by PIB Mumbai
मुंबई, 11 ऑक्टोबर 2024
एका महत्त्वपूर्ण कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे अफूचा मोठा साठा यशस्वीरित्या जप्त केला. ही कारवाई 09 ऑक्टोबर 2024 च्या पहाटे महाराष्ट्रातील एका टोल नाक्याजवळ करण्यात आली. या टोल नाक्यावर अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची ओळख पटवण्यात आली.
या वाहनाची कसून झडती घेतल्यानंतर 9,690 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली. राष्ट्रीय औषध कायदा अंमलबजावणी विभागाच्या अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणाऱ्या पदार्थांच्या (NDPS) फील्ड टेस्ट किटच्या चाचणीद्वारे या पदार्थाची पुष्टी करण्यात आली.
तपासाचा एक भाग म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या अंमली पदार्थाचा मुंबईतील प्राप्तकर्ता आणि रतलाममधील पुरवठादार या पुरवठा साखळीत सामील असलेल्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये अफूची बेकायदेशीररीत्या लागवड करणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2064284)
Visitor Counter : 40