सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
ऑगस्ट 2024 (आधार 2011-12=100) महिन्यासाठी औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकाचा आणि उपयोग आधारित निर्देशांकाचा त्वरित अंदाज
Posted On:
11 OCT 2024 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2024
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे जलद अंदाज (आयआयपी) प्रत्येक महिन्याच्या 12 तारखेला (किंवा 12 तारखेला सुट्टी असल्यास त्याआधीच्या कामकाजाच्या दिवशी) सहा आठवड्यांच्या अंतराने प्रसिद्ध केले जातात आणि स्त्रोत एजन्सींकडून प्राप्त झालेल्या डेटासह संकलित केले जातात, ज्यामध्ये उत्पादक कारखाने/ आस्थापना कडून डेटा प्राप्त होतो. आयआयपीच्या सुधारणा धोरणानुसार या जलद अंदाजांमध्ये पुढील प्रकाशनांमध्ये सुधारणा केली जाईल.
ठळक वैशिष्ट्ये :
- ऑगस्ट 2024 मध्ये आयआयपी वाढीचा दर (-)0.1 टक्के आहे जो जुलै 2024 मध्ये 4.7% होता.
- ऑगस्ट 2024 मध्ये खाणकाम, उत्पादन आणि वीज या तीन क्षेत्रांचा विकास दर अनुक्रमे (-)4.3 टक्के, 1.0 टक्के आणि (-)3.7 टक्के आहे. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खाण क्षेत्राच्या वाढीत घट होण्याची शक्यता आहे.
- आयआयपीचा जलद अंदाज ऑगस्ट 2023 मधील 145.8 च्या तुलनेत 145.6 इतका आहे. ऑगस्ट 2024 महिन्यासाठी खाण, उत्पादन आणि वीज क्षेत्रासाठी औद्योगिक उत्पादनाचे निर्देशांक अनुक्रमे 107.1, 145.9 आणि 212.3 आहेत.
- उत्पादन क्षेत्रामध्ये, ऑगस्ट 2024 महिन्यासाठी प्रमुख तीन सकारात्मक योगदान देणारे घटक आहेत – “मूलभूत धातूंचे उत्पादन” (3.0%), “विद्युत उपकरणांचे उत्पादन” (17.7%), आणि “रसायन आणि रासायनिक उत्पादनांचे उत्पादन” (2.7) %).
- मागील 13 महिन्यांसाठी मासिक निर्देशांक आणि आयआयपी वाढीचा दर (% मध्ये)
ऑगस्ट 2024 महिन्यासाठी आयआयपीच्या जलद अंदाजांबरोबरच जुलै 2024 च्या निर्देशांकांमध्ये पहिली सुधारणा करण्यात आली आहे आणि मे 2024 च्या निर्देशांकांमध्ये स्रोत एजन्सींकडून मिळालेल्या ताज्या माहितीच्या आधारे अंतिम सुधारणा करण्यात आली आहे.
सप्टेंबर 2024 साठी निर्देशांक मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केला जाईल.
टीप:-
- हे प्रसिद्धिपत्रक (इंग्रजी आणि हिंदी आवृत्ती) मंत्रालयाच्या संकेतस्थळावर - http://www.mospi.gov.in देखील उपलब्ध आहे.
- आयआयपीशी संबंधित तपशीलवार माहिती https://mospi.gov.in/iip वर उपलब्ध आहे
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2064251)
Visitor Counter : 33