ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक मानक दिन - 2024 साजरा


भारतीय मानक ब्युरोने मुंबईतील पवई येथे क्वालिटी वॉक / रन केली आयोजित

Posted On: 11 OCT 2024 4:20PM by PIB Mumbai

मुंबई, 11 ऑक्‍टोबर 2024

 

जागतिक मानक दिन- 2024 निमित्त आयोजित कार्यक्रमाचा  एक भाग म्हणून, भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) पश्चिम प्रादेशिक कार्यालयाने 11 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील आयआयटी जवळ पवई तलाव परिसरात राम आश्रमातील निसर्ग उद्यानात क्वालिटी  वॉक आणि रन आयोजित केली होती. 

तरुणांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये गुणवत्ता आणि शाश्वततेबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या क्वालिटी  वॉक आणि रनला भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम विभागाचे सरचिटणीस आणि उपमहासंचालक संजय गोस्वामी, मुंबई कार्यालय-I चे सरचिटणीस आणि प्रमुख सतीश कुमार, मुंबई कार्यालय-II चे वित्त सचिव आणि प्रमुख संजय वीज यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी भारतीय मानक ब्युरो कार्यालयाच्या मुंबई पश्चिम क्षेत्रीय कार्यालयातील आणि प्रयोगशाळेतील इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.

   

या कार्यक्रमात पश्चिम प्रादेशिक कार्यालय, मुंबई शाखा कार्यालये आणि पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. गुणवत्तेबाबत आणि दैनंदिन जीवनात मानकांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात भाग घेतला.

विविध क्षेत्रातील गुणवत्ता कायम राखण्याच्या महत्त्वावर भर देण्यासाठी देखील हे कर्मचारी एकत्र आले होते.  हा कार्यक्रम म्हणजे शाश्वतता आणि वाढीच्या दिशेने एक प्रतिकात्मक कृती होती.  सहभागींनी आयएसआय चिन्हांकित उत्पादने आणि हॉलमार्क चिन्हांकित दागिन्यांबाबत  जागृती निर्माण करण्यासाठी गुणवत्ता मानके आणि ग्राहक संरक्षण यांच्यातील संबंध अधिक मजबूत करणारे घोषवाक्यांचे फलक झळकवले.

   

भारतीय मानक ब्यूरो (BIS) ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन केलेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. मानके निर्धारित करणे, उत्पादन प्रमाणीकरण तसेच प्रयोगशाळा चाचणी आणि प्रणाली प्रमाणन ही बीआयएस ची मुख्य कामे आहेत. सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार वस्तू पुरवून, ग्राहकांचे आरोग्य धोके कमी करून, पर्यावरणाचे संरक्षण करून बीआयएस राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे. बीआयएस ची मानके आणि उत्पादन प्रमाणन योजना ग्राहक आणि उद्योगांना फायदा पोहोचवण्याव्यतिरिक्त विशेष करून उत्पादन सुरक्षा, ग्राहक संरक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, इमारत आणि बांधकाम इ. सारख्या विविध सार्वजनिक धोरणांना देखील समर्थन देतात. 

   

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2064186) Visitor Counter : 30


Read this release in: English