अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभागाच्या (DAE) बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आइसोटोप टेक्नॉलॉजी (BRIT) युनिटने विकसित केले औद्योगिक वापरासाठीचे स्वदेशी बनावटीचे ROTEX-I रेडिओग्राफी उपकरण

Posted On: 01 OCT 2024 10:23PM by PIB Mumbai

मुंबई, 1 ऑक्‍टोबर 2024

 

ब्रीट (BRIT), अर्थात बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आइसोटोप टेक्नॉलॉजी या अणुऊर्जा विभागाच्या (DAE) युनिटने (केंद्र), “ROTEX-I” (रोटेक्स-I), हे स्वदेशी बनावटीचे पहिले औद्योगिक रेडिओग्राफी डिव्हाइस (उपकरण) विकसित केले असून, यामधून भारताच्या नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (एनडीटी), अर्थात  अविनाशक चाचणी क्षेत्रातील महत्वाचा टप्पा अधोरेखित झाला आहे.

रोटेक्स-I हे Iridium-192 चे 2.40 TBq (65 Ci) वाहून नेण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले असून, नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (एनडीटी) उद्योगाद्वारे त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होईल, अशी अपेक्षा आहे. रसायने उद्योग, ऊर्जा क्षेत्र, संरक्षण, अणुउद्योग आणि हवाई अवकाश उद्योग, ई क्षेत्रांमध्ये या उपकरणाचा वापर करता येईल.

ब्रीटच्या नवी मुंबई येथील मुख्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष (AEC) आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव (DAE) अजित कुमार मोहंती, यांच्यासह अणुऊर्जा विभागातील शास्त्रज्ञ, एनडीटी उद्योग आणि उत्पादन क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. मोहंती यांनी आपल्या भाषणात, रोटेक्स-I  हे स्वदेशी रेडिओग्राफी उपकरण विकसित केल्याबद्दल ब्रीट च्या चमूचे अभिनंदन केले. सामाजिक वापरासाठी  जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्यात ब्रीट बजावत असलेल्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, नॉन-पॉवर ऍप्लिकेशनमध्ये, अणुऊर्जा विभागाने केवळ आरोग्यसेवा आणि कृषी क्षेत्रासाठीच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रासाठी देखील योगदान दिले आहे. ते म्हणाले की, रोटेक्स-I हा या प्रयत्नांमधील आणखी एक महत्वाचा टप्पा आहे. ते म्हणाले की, अणुउर्जा विभागाने विकसित केलेले हे उपकरण पूर्णपणे स्वदेशी असून, खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे. तसेच, यामध्ये ‘ध्रुव’, या आपल्या संशोधन अणुभट्टीने इरिडियम 192, या आवश्यक रेडिओ आयसोटोपची निर्मिती केली असून, भारतीय उद्योगाने सर्व घटकांच्या निर्मितीमध्ये आघाडीची भूमिका घेतली आहे. भारतीय उद्योगांसाठी हे उत्पादन आयात केलेल्या उपकरणाच्या   जवळजवळ निम्म्या किमतीला उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

   

दिग्गज शास्त्रज्ञ आणि ब्रीट चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप मुखर्जी म्हणाले की, रोटेक्स-I हे पर्यायी उत्पादन असून, ते भारताच्या नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (NDT) उद्योगाच्या 4 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात उपयोगी ठरेल.

उद्योगांनी रोटेक्स-I साठी सकारात्मक प्रतिसाद नोंदवला, आणि हे उत्पादन त्यांच्या व्यवसायाला चालना देईल आणि यापुढे त्यांना आयात केलेल्या उपकरणांवर अवलंबून राहावे लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2060946) Visitor Counter : 39


Read this release in: English