आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आयुष मंत्र्यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आणि ‘विशेष अभियान 4.0’ च्या प्रगतीचा घेतला आढावा

Posted On: 26 SEP 2024 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 सप्‍टेंबर 2024

 

सध्या सुरू असलेल्या 'स्वच्छता ही सेवा अभियान' आणि 'विशेष अभियान 4.0' च्या प्रगतीबाबत केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत विविध संस्था आणि संघटनांनी  देशभरात 521 स्वच्छता उपक्रम हाती घेतल्याचे  बैठकीदरम्यान अधोरेखित करण्यात आले. या अभियानात खालील क्षेत्रांमध्ये  स्वच्छता आणि समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यावर अधिक लक्ष  केंद्रित करण्यात आले आहे:

  • ‘स्वच्छता में जन भागीदारी’: सध्या देशभरात 243  उपक्रम सुरू आहेत, जे  स्वच्छतेच्या उपक्रमांमध्ये जनतेचा  सहभाग सुनिश्चित करत आहेत.
  • ‘संपूर्ण स्वच्छता’: सर्वसमावेशक स्वच्छता तसेच स्वच्छता उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 93  उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
  • ‘सफाईमित्र सुरक्षा शिविर’: सफाई  कामगारांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यावर 185 उपक्रम केंद्रित आहेत.

आयुष मंत्र्यांनी विशेष अभियान 4.0 चा सविस्तर आढावाही घेतला आणि त्याची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीच्या महत्त्वावर भर दिला. प्रतापराव जाधव यांनी सध्या सुरु असलेल्या उपक्रमांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच अभियानाच्या उपक्रमांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

आपल्या भाषणात जाधव म्हणाले, “स्वच्छता अभियान  जे आपल्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक दूरदर्शी उपक्रम आहे , त्याची अंमलबजावणी करणे हे आपले कर्तव्य आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि जलशक्ती मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या अभियानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण समर्पित वृत्तीने आणि उत्साहाने  काम करायला हवे.”

आढावा बैठकीत व्यापक राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियानाच्या  अनुषंगाने स्वच्छता आणि उत्तम आरोग्याला चालना देण्याप्रति  मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2059148) Visitor Counter : 15


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil