विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था 26 सप्टेंबर रोजी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा 83 वा स्थापना दिवस साजरा करणार
Posted On:
24 SEP 2024 9:52PM by PIB Mumbai
गोवा, 24 सप्टेंबर 2024
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था (CSIR-NIO) 26 सप्टेंबर 2024 रोजी डोना पॉला येथे CSIR संस्थेचा 83 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. एनआयओ च्या सभागृहात सकाळी 09.30 ते दुपारी 03.00 या वेळेत या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, एनआयओ ने गोव्यातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि महासागर संशोधन क्षेत्रात संस्थेने हाती घेतलेल्या वैज्ञानिक उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. विद्यार्थ्यांना सागरी संसाधने आणि साधनांवरील प्रदर्शनाला भेट देण्याची आणि सागरी विज्ञानावरील चित्रपट पाहण्याची संधी मिळेल. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणीची आवश्यकता नसून, विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुला राहील.
सभागृहात दुपारी 12.00 वाजता इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'करिअर इन ओशनोग्राफी' या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
विविध विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमधील अत्याधुनिक संशोधन आणि विकास (R&D) ज्ञान संचयासाठी ओळखल्या जाणाऱ्या CSIR कडे 37 राष्ट्रीय प्रयोगशाळा, 39 आउटरीच केंद्रे, एक इनोव्हेशन संकुल आणि संपूर्ण भारतातील तीन युनिट्सचे सुसज्ज नेटवर्क आहे.आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाश्वत उपाय आणि क्षमता विकसित करून नवोन्मेशी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि विकासाद्वारे भारतातील नागरिकांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवणे, हे CSIR चे उद्दिष्ट आहे.
* * *
PIB Panaji | N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2058412)
Visitor Counter : 40