विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईत वरळी इथल्या नेहरू विज्ञान केंद्रात मेटल आयन 2024 या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

Posted On: 22 SEP 2024 5:00PM by PIB Mumbai

मुंबई, 22 सप्‍टेंबर 2024

 

मुंबईत वरळी इथल्या नेहरू विज्ञान केंद्रात आजपासून मेटल आयन 2024 या आंतरराष्ट्रीय परिसंवादाला सुरुवात झाली. यानिमित्ताने आज झालेल्या कार्यक्रमाला आंतर विद्याशाखीय संशोधन, पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ तसेच देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित  होते.

प्रा. (डॉ.) सुनाली खन्ना यांनी या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवले. तर  अमेरिकेतील प्रा. (डॉ.) इरिना स्टेपानोव्ह, तुर्कीये इथले प्रा. (डॉ.) उलाज ओझ आणि भारतीय मौखिक औषधशास्त्र आणि किरणोत्सर्ग शास्त्र अकादमीचे (Indian Academy of Oral Medicine & Radiology) अध्यक्ष प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि सोक्लिन (सोसायटी फॉर क्लीन एन्व्हायर्नमेंट) या नामांकित स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. ए. डी. सावंत यांच्यासह तामिळनाडूचे प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि सदस्य सचिव, तामिळनाडूच्या पाणथळ प्राधिकरण आणि तामिळनाडू सरकारच्या हरित तामिळनाडू अभियानाचे मुख्य अभियान संचालक दीपक श्रीवास्तव हे मान्यवर या परिसंवादाला उपस्थित होते.

    

आज सुरू झालेल्या मेटल आयन 2024 या आंतरराष्ट्रीय परिसंवादात पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि मौखिक औषधांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांच्या केंद्रस्थानी असलेल्या सुदृढ पर्यावरणासाठी जागरूकतेला चालना (Fostering awareness for a healthy environment) या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वैशिष्ट्यपूर्ण परिसंवादादरम्यान इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक सादरीकरण स्पर्धेचेही आयोजन केले गेले आहे.

राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियान उपक्रमाच्या अनुषंगाने या परिसंवादात विज्ञाननिष्ठ नवोन्मेषाला गती देण्यासाठी पर्यावरणीय स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले जाणार आहे. या परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये भारतातील शाळांनीही त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवण्याचे आवाहनही केले गेले आहे. यानिमित्ताने येणाऱ्या युवा सहभागींना सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणविषयक समस्यांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांबाबतचे त्यांचे आकलन, त्यांची, सर्जनशीलता आणि त्यांच्यामधील संशोधन कौशल्य उपस्थितांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

    

एका अर्थाने या परिसंवादाचे आयोजन म्हणजे सहभागी विद्यार्थी तसेच त्यांच्यामधील विज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्राच्या देशाच्या भविष्यातील नेतृत्वासोबत घडून येणारा प्रेरणादायी संवादाचा समृद्ध अनुभव ठरणार आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/T.Pawar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057601) Visitor Counter : 52


Read this release in: English