आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अन्न सुरक्षा क्षेत्रात ब्राझीलच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयासोबत केला सामंजस्य करार

Posted On: 22 SEP 2024 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआई) ने नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये, जागतिक अन्न नियामक परिषद, 2024 दरम्यान ब्राझीलच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयासोबत (एमएपीए) सामंजस्य करार केला.

संयुक्त प्रकल्प आणि तांत्रिक सहकार्याद्वारे अन्न सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार सहकार्याचा एक नवीन टप्पा सुरू करणारा आहे. त्यावर ब्राझीलचे कृषी आणि पशुधन मंत्री कार्लोस हेन्रिक बाकेटा फावारो आणि एफएसएसएआईचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमला वर्धन राव यांनी स्वाक्षरी केली.

जी. कमला वर्धन राव म्हणाल्या, “या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याने अन्न सुरक्षेबद्दलचे आमचे समर्पण दिसून येते आणि अन्न सुरक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या आमच्या चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये मोठी प्रगती दर्शवते. सामाईक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी आम्ही एमएपीएसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.”

ब्राझीलच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी पुढे सांगितले की, “या सामंजस्य करारावर स्वाक्षरी म्हणजे अन्न सुरक्षा क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांचा एक मैलाचा दगड आहे, जो तांत्रिक सहकार्य आणि अनुभव व ज्ञानाचे आदानप्रदान करण्यास मदत करतो, संस्थात्मक सहकार्यास बळकटी देतो आणि संयुक्त उपक्रमांच्या दिशेत प्रगतीची वाटचाल सुरू करतो.”

एफएसएसएआई आणि एमएपीए हे दोघेही परस्पर फायदेशीर करण्यासाठी आणि उत्पादक भागीदारी वाढवण्यासाठी वचनबद्ध आहेत.

 

* * *

S.Patil/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2057580) Visitor Counter : 64


Read this release in: English , Urdu , Hindi