माहिती आणि प्रसारण मंत्रालय
६५ गौरवशाली वर्षे: भारताच्या प्रसारण इतिहासाला आकार देणारा दूरदर्शनचा वारसा
Posted On:
14 SEP 2024 7:15PM by PIB Mumbai
15 सप्टेंबर 1959 रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. भारत सरकारच्या अंतर्गत एक स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक म्हणून, हे प्रसार भारतीच्या दोन विभागांपैकी एक आहे. आज, दूरदर्शन ही स्टुडिओ आणि ट्रान्समीटरच्या विशाल नेटवर्कसह भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. हे दूरचित्रवाणी, ऑनलाइन आणि मोबाइल अशा सेवा प्रदान करते, जे महानगर आणि प्रादेशिक या दोन्ही ठिकाणी तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.
इतिहास
सार्वजनिक सेवा प्रक्षेपणातील एक साधा प्रयोग म्हणून दूरदर्शनची सुरुवात झाली. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री राजेंद्र प्रसाद यांनी 15 सप्टेंबर 1959 रोजी पहिल्या प्रसारणाचे उद्घाटन केले. 1959 मध्ये एका आघाडीच्या युरोपियन कंपनीने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात क्लोज-सर्किट टीव्ही उपकरणे प्रदर्शित केली. एक्स्पोच्या शेवटी भारतातील लोकांना ही उपकरणे भेट देण्यात आली.
हा प्रयोग 1965 मध्ये एक नियमित सेवा बनला जेव्हा दूरदर्शनने देशाची राजधानी नवी दिल्लीतील आणि तिच्या आसपासच्या घरांमध्ये सिग्नल पोहोचवायला सुरुवात केली. 1972 पर्यंत मुंबई आणि अमृतसर आणि 1975 पर्यंत आणखी सात शहरांमध्ये सेवांचा विस्तार करण्यात आला. 1975 पर्यंत ते ऑल इंडिया रेडिओचा भाग होते. 1 एप्रिल 1976 रोजी त्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयात एका स्वतंत्र विभागाचे रूप घेतले आणि नंतर ते प्रसार भारतीच्या कक्षेत आले.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनद्वारे एक नवीन वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा तयार केली गेली आणि पंडित रविशंकर यांनी वैशिष्ट्यपूर्ण धून म्हणजेच सिग्नेचर ट्यून तयार केली. जेव्हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 15 ऑगस्ट 1982 रोजी पहिले रंगीत प्रसारण झाले.
वर्तमान परिस्थिती
गेल्या काही वर्षांमध्ये दूरदर्शन 35 उपग्रह वाहिन्या चालवणाऱ्या महाजालामध्ये विस्तारले गेले आहे, त्यापैकी 6 अखिल भारतीय वाहिन्या आहेत आणि 22 प्रादेशिक वाहिन्या आहेत (24X7). तसेच, दूरदर्शन 6 प्रादेशिक (24X7 नसलेल्या ) आणि 1 आंतरराष्ट्रीय वाहिनी चालवते. त्यांच्याकडे एकूण 59 ट्रान्समीटर आहेत. वरील स्थानकांव्यतिरिक्त, दूरदर्शन अर्थ स्टेशन, तोडापूर, दिल्ली येथून “डीडी फ्री डिश” ही डीडी डीटीएच सेवा चालवत आहे.
दूरदर्शनचे काळाच्या पुढचे कार्यक्रम
दूरदर्शनच्या कालातीत कथा आणि निरंतर कथाकथन अतुलनीय आहे. मर्यादित संसाधने आणि तंत्रज्ञान असूनही रामायण, महाभारत, हम लोग, बुनियाद, मालगुडी डेज आणि उडान यांसारख्या कार्यक्रमांनी दर्जेदार आशयाबाबत एक गुणवत्ता निश्चित केली आहे. दूरदर्शनने अनेक पिढ्यांना आशयघन केले आहे आणि अद्यापही जागरूकता निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
कोविड महामारीच्या काळात दूरदर्शनचे उपक्रम
कोविड-19 महामारी आणि त्यानंतरच्या टाळेबंदीदरम्यान भारतातील सार्वजनिक प्रसारकांनी विविध राज्य सरकारी संस्थांसोबत, ऑल इंडिया रेडिओसह व्हर्च्युअल क्लासेस आणि इतर शैक्षणिक सामग्री देशभरातील त्यांच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे टीव्ही, रेडिओ आणि युट्यूबवर प्रसारित करण्यासाठी सहकार्य केले. शालेय वर्गांच्या अनुपस्थितीत या आभासी वर्गांनी लाखो विद्यार्थ्यांना, विशेषत: 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या बोर्ड आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी मदत केली.
तसेच, एक मनोरंजक क्रियाकलाप शिकत राहण्यासाठी अभ्यासक्रमातील सामग्री व्यतिरिक्त काही राज्यांमधील आभासी वर्गांमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींचे कथाकथन आणि क्विझ शो यांचा समावेश केला गेला.
डीडीमधील तंत्रज्ञान प्रगती
दूरदर्शन किसानने एआय क्रिश आणि एआय भूमी हे दोन एआय सादरकर्ते आणले आहेत. या एआय सादरकर्त्यांमुळे दूरदर्शन किसान ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी भारतातील पहिली सरकारी दूरचित्रवाणी वाहिनी ठरली आहे . एआय सादरकर्ते मानवी सादरकर्त्यांप्रमाणेच दिसण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, जे विराम न घेता 24/7 बातम्या देण्यास सक्षम आहेत. एआय सादरकर्ते 50 भाषा बोलू शकतात.
डीडी फ्री डिश
डीडी फ्री डिश डीटीएच सेवा ही प्रसार भारती या सार्वजनिक सेवा प्रसारकाच्या मालकीची असून तिच्यातर्फे चालवली जाते. डीडी फ्री डिश
ही एकमेव फ्री-टू-एअर (एफटीए) डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) सेवा आहे जिथे दर्शकांसाठी कोणतेही मासिक सदस्यता शुल्क नाही. हे सर्वांसाठी अतिशय परवडणारे आहे कारण त्यासाठी सेट-टॉप-बॉक्स (एसटीबी) आणि ॲक्सेसरीजसह लहान आकाराच्या डिश अँटेना खरेदीसाठी सुमारे 1500/- ते 2000/- रुपयांची फक्त एक वेळची छोटी गुंतवणूक आवश्यक आहे.
फिक्की - ईवायनुसार, जानेवारी 2024 पर्यंत, डीडी फ्री डिश ने 22 एमपीईजी4 वाहिनीव्यतिरिक्त 37 दूरदर्शन वाहिन्या, 51 शैक्षणिक वाहिन्या आणि 79 खासगी वाहिन्यांसह 167 एमपीईजी2 (मूव्हिंग पिक्चर्स आणि संबंधित ऑडिओ माहितीचे जेनेरिक कोडिंग) वाहिन्यांचे यजमानपद सांभाळले. डीडी फ्री डिशच्या या अद्वितीय फ्री टू एअर मॉडेलने त्याला सर्वात मोठे डीटीएच प्लॅटफॉर्म बनवले आहे आणि आज डीडी फ्री डिश सुमारे 45 दशलक्ष घरांपर्यंत पोहोचत आहे (फिक्की ई वायअहवाल 2023 नुसार).
ठळक वैशिष्ट्ये
दूरदर्शनच्या 65 गौरवशाली वर्षांचा शुभारंभ करण्यासाठी #DilseDD@65 ही सोशल मीडिया मोहीम सुरू करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत दूरदर्शनचे मिशन आणि व्हिजन व्हिडिओच्या स्वरूपात प्रेक्षकांसोबत सामायिक केले जात आहे.
दूरदर्शन आता प्रेक्षकांचे मनोरंजन आणि शिक्षण अशा दोन्ही प्रकारांमध्ये विविध कार्यक्रम देत आहे. प्रेक्षक सकाळी ६ वाजता अयोध्येतील पवित्र आरतीच्या थेट प्रक्षेपणात तल्लीन होऊन रामलल्लाच्या दिव्य दर्शनाने त्यांच्या दिवसाची सुरुवात करू शकतात. वाहिनीवर उषा परिणय, आराधना, महाभारत, साई बाबा आणि संकट मोचन हनुमान असे विविध प्रकारचे आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम देखील दाखवले जातात.
तरुण दर्शकांसाठी, डीडीने मॉडेल्स आणि हम तो मध्यमवर्गीय हैं जी यासारखे डेली सोप सादर केले आहेत. याव्यतिरिक्त, सायबर क्राइम की दुनिया, बच के रहना, देसी रसोई से आणि खेत खेत में यासारखे नवीन आणि चाकोरीबाहेरचे कार्यक्रम वाहिनी दाखवत आहे.
सरकारने 2021-26 या कालावधीसाठी 2539.61 कोटी रुपये खर्चाची “ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट” ही केंद्रीय क्षेत्र योजना दुर्गम, आदिवासी, डावे नक्षली, सीमावर्ती क्षेत्रे, महत्त्वाकांक्षी जिल्हे आणि धोरणात्मक/राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा इतर क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सेवा प्रसारणाच्या विस्ताराचा समावेश असलेल्या विविध घटकांसह सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.
दूरदर्शनने नये भारत का नया दूरदर्शन या संकल्पनेवर आधारित, स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा या नावाचा एक मेगा ऐतिहासिक कार्यक्रम प्रसारित केला, जो भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करणारा 75 भागांचा विशाल कार्यक्रम आहे.
कोविड टाळेबंदीदरम्यान, दूरदर्शनने दर्शकसंख्येबाबत नवीन विक्रमांना स्पर्श केला. जुन्या ठेवी असलेल्या मालिका डीडी नॅशनल आणि डीडी भारतीवर पुन्हा प्रसारित केल्या गेल्या.
संपूर्ण डीडी नेटवर्क बदलत्या काळाशी सुसंगत बनवण्याच्या आणखी एका टप्प्यात, डीडी स्पोर्ट्स डीडी स्पोर्ट्स एचडी बनले आहे. यामुळे प्रेक्षकांना हाय-डेफिनिशन ट्रान्समिशनमध्ये प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे प्रसारण पाहणे शक्य झाले आहे.
प्रसार भारती राष्ट्र उभारणीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि देश आणि परदेशातील सर्वांपर्यंत अर्थपूर्ण आणि अचूक आशय पोहोचवण्यावर सतत लक्ष देत आहे. (डिसेंबर 2023 पर्यंत) प्रसार भारतीने विविध देशांसोबत 46 सामंजस्य करार केले आहेत.
अरुणाचल प्रदेश राज्यासाठी डीडी अरुणप्रभा वाहिनी माननीय पंतप्रधानांनी 9 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली.
07 मार्च, 2022 रोजी, भारताच्या सार्वजनिक प्रसारक प्रसार भारतीने 'Yupp TV', या ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, जे जगभरातील दूरदर्शन दर्शकांसाठी प्रवेशद्वार आहे. यामुळे डीडी इंडिया आता यूएसए, यूके, युरोप, मध्य पूर्व, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील युप टीव्हीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
बदलत्या काळानुसार दूरदर्शन स्वतःला नव्याने शोधत आहे आणि एक नवीन रूप आणि अनुभव घेऊन आले आहे. दूरदर्शन नेटवर्कची प्रमुख वाहिनी असलेल्या डीडी नॅशनलने अनेक नवीन कार्यक्रम सुरू केले आहेत. बॉलिवूडचे कलावंत सुभाष घई पहिल्यांदाच जानकी नावाची टीव्ही मालिका घेऊन आले आहेत.
डीडी नॅशनलने दैनंदिन हिंदी फीचर फिल्म सुरू करणे, मॉर्निंग मॅगझिन शो - डीडी मॉर्निंग शो, आणि दूरदर्शनचे प्रतिष्ठित कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रहार आणि रंगोलीचे पुनरुज्जीवन करणे यासारखे अनेक नवीन उपक्रम हाती घेतले आहेत.
मुंबई-स्थित किड्स यूट्यूब चॅनल पंटून किड्सने डीडीवर त्यांची सामग्री प्रसारित करण्यासाठी दूरदर्शनसोबत भागीदारी केली आहे.
***
NM/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055149)
Visitor Counter : 118