सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीजने ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अभियानाचा केला प्रारंभ
Posted On:
14 SEP 2024 3:53PM by PIB Mumbai
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) (एवायजेएनआयएसएचडी (डी), वांद्रे पश्चिम, मुंबईने 'स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता (4एस ) मोहिमेचा प्रारंभ केला. हा 15 दिवसांचा देशव्यापी उपक्रम आहे. स्वच्छ भारत मिशनचा एक भाग म्हणून स्वच्छता आणि वर्तनशैलीतील बदलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आजपासून सुरू झालेली ही मोहीम 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालणार आहे. ही मोहीम संपूर्ण देशात लोक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वच्छतेची संस्कृती अधिक बळकट करण्यासाठी राबवण्यात येत आहे.

या उपक्रमाला अधिकृत प्रारंभ एवायजेएनआयएसएचडी (डी) येथे आज एका विशेष कार्यक्रमाने झाला. उद्घाटन वांद्रे पश्चिम, बीएमसी-वॉर्डचे एएचएस सुधाकर क्षेत्री यांनी केले. कार्यक्रमादरम्यान बोलताना सुधाकर क्षेत्री यांनी ‘स्वच्छता मोहीम’ आपल्या घरातून आणि संस्थेपासून सुरू करण्याची गरज व्यक्त केली. आपल्या प्रमुख भाषणात एवायजेएनआयएसएचडीचे संचालक डॉ. सुमन कुमार, यांनी,2014 मध्ये भारत सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत अभियान'ची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल संस्थेच्या आणि मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या 'सफाई कर्मचाऱ्यांचे' कौतुक केले. याप्रसंगी कार्यक्रमात सहभागी होणा-या विविध गटांना एकत्र आणले, गेले. ज्यामध्ये संस्थेचे अधिकारी, विद्यार्थी, वाणी आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्ती आणि बीएमसी कर्मचारी यांचा समावेश आहे. सर्व उपस्थितांनी ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ मध्ये सहभाग घेतला आणि मोहिमेच्या उद्दिष्टांविषयी बांधिलकीची पुष्टी केली.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि पेयजल आणि स्वच्छता विभाग (DDWS) यांच्या नेतृत्वाखाली या वर्षी 'स्वभाव स्वच्छता , संस्कार स्वच्छता’ (4S)' मोहिमेला प्रारंभ झाला. या 4 एस मोहीमेचा उद्देश व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांना एकत्रितपणे जोडणे आहे. स्वच्छता आणि स्वच्छ वर्तन पद्धती वाढविण्याचा प्रयत्न करणे, नैसर्गिक स्वच्छता, सामाजिक मूल्ये आणि स्वच्छ वातावरण तयार करण्यासाठी वैयक्तिक जबाबदारी यांचे एकत्रीकरण यावर या संकल्पनेत भर दिला आहे.

‘भव्य स्वच्छता मोहिमे’च्या उद्घाटनाच्या सहभागींमध्ये संस्थेचे अधिकारी, विद्यार्थी, वाणी आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्ती आणि बीएमसीचे अधिकारी, कर्मचारी, या प्रमुख राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये वर्तणुकीतील बदल घडवून आणण्यासाठी आणि संस्थेच्या ‘सफाई कर्मचारी’ वर्गाच्या पाठिंब्याने स्वच्छ आणि निरोगी संस्था परिसर राखण्यासाठी सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेले विविध उपक्रम आणि कार्यक्रम सादर केले जातील. ‘एवायजेएनआयएसएचडी’ ने या महत्त्वपूर्ण मोहिमेचा एक भाग बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच स्वच्छ, निरोगी भारताच्या व्यापक उद्दिष्टात योगदान देण्यास उत्सुकता दर्शवली आहे.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055002)
Visitor Counter : 47