शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, व्ही. एन. आय.टी नागपूरचा 22 वा दीक्षांत समारंभ 15 सप्टेंबर रोजी


नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजय कुमार सारस्वत यांची प्रमुख उपस्थिती ;एकूण 1225 पदव्या प्रदान करण्यात येणार

Posted On: 14 SEP 2024 2:40PM by PIB Mumbai

नागपूर 14 सप्टेंबर 2024

नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, व्ही. एन. आय.टी - चा 22 वा दीक्षांत सोहळा 15 सप्टेंबर, रविवार  रोजी  सकाळी 9 वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करणार आहे. महान दूरदर्शी भारतरत्न, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त व्ही. एन. आय.टी दरवर्षी अभियंता दिनी, म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी दीक्षांत समारंभ आयोजित करीत असते. या दीक्षांत समारंभाप्रसंगी नीती आयोगाचे सदस्य आणि रक्षा संशोधन आणि विकास संस्था -  डीआरडीओचे माजी सचिव डॉ. विजय कुमार सारस्वत ,व्ही. एन. आय. टी. च्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष  मदन गोपाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील  अशी माहिती व्ही. एन. आय. टी. नागपूरचे संचालक, प्रा. प्रेमलाल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली .  याप्रसंगी शैक्षणिक विद्याशाखेचे अध्यक्ष प्रा. विलास कळमकर ,व्हीएनआयटीच्या यांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आणि जनसंपर्क अधिकारी  मंगेश कोटंबकर उपस्थितीत होते.

व्ही . एन . आय . टी  च्या  22 व्या दीक्षांत समारंभात एकूण 1,225 पदव्या प्रदान करण्यात येणार आहे . ज्यात 95 डॉक्टर ऑफ फिलोसोफी, 239 विद्यार्थ्यांना एम. टेक. 60 विद्यार्थ्यांना एम . एससी , 765 अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी तसेच 73 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची पदवी प्रदान करण्यात येणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उपलब्धीकरिता पदक व पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल .

याप्रसंगी व्हीएनआयटीच्या शैक्षणिक कामगिरी बद्दल   व्हीएनआयटी चे संचालक प्रा . पटेल यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे यावर्षी  प्रसिद्ध करण्यात आलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशन फ्रेमवर्क रँकिंग - एन. आय. आर. एफ. रँकिंगमध्ये व्हीएनआयटीने संपूर्ण देशात अभियांत्रिकी श्रेणीत 39 वे स्थान आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मध्ये 6 वे स्थान तर आर्किटेक्चर प्लॅनिंग श्रेणीत 10 वे स्थान पटकावले असून एकंदरीत क्रमवारीमध्ये 77 वे स्थान प्राप्त केले असल्याची माहिती  दिली . याशिवाय आशिया विद्यापीठ क्रमवारी ,जागतिक विद्यापीठ क्रमवारी मध्ये देखील विद्यापीठाने चांगली कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

व्ही. एन. आय. टी. नागपूरने  वायरलेस चार्जिंग संबंधित मल्टीपल टेक्नॉलॉजीसाठी ५० कोटी रुपये खर्चून ई- मोबिलिटी रोड ऑफ इंडिया २०२४ ची अंमलबजावणी करणारी एजन्सी म्हणून या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे . विविध  विद्याशाखेतील सदस्यांचे 393 जर्नल्स मध्ये आणि कॉन्फेरंस प्रोसिडिंग्स मध्ये 102 शोधलेख प्रकाशित झाले असून जानेवारी 2023 पासून आत्तापर्यंत 50  पेटंट मंजूर झाले आहेत आणि 20  पेटंट प्रकाशित झाले आहेत .

व्हिएनआयटी. कॅम्पसमध्ये 185 संस्थांच्या सहकार्याने 813 विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत यामध्ये सर्वात जास्त पॅकेज हे 64 लाख प्रति वर्ष असे होते अशी माहिती देखील संचालकांनी यावेळी दिली.

***

SR/DW/PK/DD

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054916) Visitor Counter : 90