अणुऊर्जा विभाग
एईआरबी ने राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प - युनिट 7 च्या अत्यावश्यक प्रथम दृष्टिकोनाला दिली परवानगी
प्रविष्टि तिथि:
10 SEP 2024 10:15PM by PIB Mumbai
मुंबई, 10 सप्टेंबर 2024
भारताची अणुसुरक्षा नियामक संस्था, अणुऊर्जा नियामक मंडळ (AERB) ने राजस्थान अणुऊर्जा प्रकल्पाच्या (RAPP) युनिट-7 मध्ये नियंत्रित अणुविखंडन अभिक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सुरक्षा उपाय आणि कार्यान्वयन तत्परतेचा सखोल आढावा घेतल्यानंतर हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प, युनिट-7, राजस्थानमधील रावतभाटा जिल्ह्यात स्थित असून हे स्वदेशात आरेखित आणि विकसित केलेले 700 MWe प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर (PHWR) चे तिसरे युनिट आहे. हे युनिट गुजरातमधील काक्रापार अणुऊर्जा प्रकल्पात (KAPP) सध्या कार्यरत असलेल्या युनिट्सला जोडले जाईल.
अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (AERB) अधिकृततेमध्ये अणुभट्टीच्या नियंत्रक प्रणालीमध्ये जड पाण्याची भर घालणे आणि अत्यावश्यक असा प्रथम दृष्टीकोन सुरू करणे समाविष्ट आहे, ज्यामध्ये नियंत्रित परमाणु विखंडन समाविष्ट आहे. यात कमी शक्तीच्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगांचे आयोजन देखील समाविष्ट आहे. हा निर्णय अणुभट्टीची रचना, बांधकाम आणि कार्यान्वयनाच्या सज्जतेचे सर्वसमावेशक मूल्यांकन तसेच तपशीलवार विचारविनिमय केल्यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
“अणुऊर्जा नियामक मंडळाच्या परवानगीतून आमच्या कठोर नियामक निरीक्षण तसेच सर्व सुरक्षा आणि नियामक मानकांचे पालन स्पष्ट होते. यावर अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष डी. के. शुक्ला यांनी जोर दिला. आमची पद्धतशीर पुनरावलोकने आणि तपासण्या सर्वोच्च सुरक्षा पातळी सुनिश्चित करतात. आमचा निवासी कार्यस्थळ निरीक्षक चमू कमिशनिंग प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण करत राहील, असेही ते म्हणाले.
राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प, युनिट-7 च्या पूर्ण कार्यान्वित होण्याच्या दिशेने आणि भारताच्या व्यावसायिक वीज निर्मिती क्षमतेमध्ये भरीव योगदान देण्याच्या दिशेने ही मान्यता एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2053598)
आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English