अर्थ मंत्रालय
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे 11 सप्टेंबर रोजी नवपदोन्नत आयकर सहायक आयुक्तांसाठी ‘उत्तरायण-II -2024’ या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
10 SEP 2024 7:43PM by PIB Mumbai
नागपूर, 10 सप्टेंबर 2024
प्राप्तीकर अधिकाऱ्यांमधून नव्याने बढती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांना भारतीय महसूल सेवेतील सहायक आयुक्त किंवा सहायक संचालक या पदासाठी व कर प्रशासनाच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे सात आढवड्याच्या कालावधीचे 'उत्तरायण-II 2024' या प्रशिक्षण आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ 11 सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या उद्घाटन समारंभाला हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च - नालसार विधी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो.श्रीकृष्ण देव राव हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अग्रणी संस्था आहे.या प्रशिक्षणात प्रत्यक्ष कर वसुली व करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या प्रमुख कार्याच्या प्रशिक्षणाशिवाय अधिकाऱ्यांना पैशाच्या गैरव्यवहारासारख्या आर्थिक गुन्हे व विविध आर्थिक घोटाळे यांचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाते.
प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या शारिरिक सुदृढतेवरही पुरेसा भर दिला जातो.अकादमीमध्ये असणाऱ्या व्यायामशाळा ,आधुनिक जलतरण व उत्कृष्ट क्रीडा सुविधांचा वापर करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. निवासी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर एक आठवडा भारत दर्शन करण्याची संधी या अधिकाऱ्यांना मिळणार आहे.
उद्घाटन समारंभाला नागपूर आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
NADT PRO/DW/SR/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2053548)
आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English