ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

473 मेट्रिक टन तांदळाची विक्री, 435 मेट्रिक टनची एफसीआय डेपोतून उचल, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून खुल्या बाजारात विक्री योजनेचे यशस्वीरित्या उद्घाटन

Posted On: 05 SEP 2024 5:37PM by PIB Mumbai

मुंबई, 05 सप्टेंबर 2024

‘एकूण पाच ई-लिलाव करण्यात आले असून त्याद्वारे 1,50,000 मेट्रिक टन तांदूळ विक्रीसाठी ठेवण्यात आला. आजवर 473 मेट्रिक टन तांदळाची यशस्वीरित्या विक्री झाली असून 435 मेट्रिक टन तांदूळ भारतीय अन्न महामंडळा-’ (एफसीआय)-च्या डेपोतून उचल करण्यात आली आहे.’ पहिली निविदा 2 ऑगस्ट 2024 रोजी जारी करण्यात आली तेव्हापासूनची ही प्रगती आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष 2024-25 साठी खुल्या बाजारात विक्री योजना (देशांतर्गत) - [ओएमएसएस (डी)]चे हे यश आहे.

ओएमएसएस (डी)

ओएमएसएस (डी) या योजनेचे उद्देश भात बाजारात स्थिरत्व आणणे, उपलब्धतेची खात्री करणे आणि जास्तीच्या उत्पादनाचे परिणामकारक व्यवस्थापन हे आहेत. सुरू असलेल्या लिलावांमार्फत विविध भागीदारांना बाजारातील व्यवहारात सहभागी होण्याच्या संधी मिळत राहतील, असे अपेक्षित आहे.

या योजनेच्या अंतर्गत, व्यापारी, नामप्रविष्ट घाऊक खरेदीदार, तांदळाच्या उत्पादनांचे उत्पादक यांच्याकडून निविदा मागवण्यासाठी दर आठवड्याला नोटिसा जारी केल्या जातात. धोरणानुसार प्रत्येक भागीदाराला एका पॅन क्रमांकाचा वापर करून दर आठवड्यातील लिलावात एका प्रदेशात एक निविदा अशा प्रकारे सहभागी होता येते;नोंदणीकृत संस्था, जीएसटी क्रमांक किंवा विभागीय कार्यालयांची संख्या कितीही असो, ही अट अशीच लागू आहे. तसेच, प्रत्येक खरेदीदाराला 2,000 मेट्रिक टनाची मर्यादा धोरणातील मार्गदर्शक सूचनांमध्ये लागू केली आहे.

तांदळाची किंमत ही राखीव किंमत अधिक वाहतुकीचा खर्च, फोर्टिफाईड (अतिरिक्त पोषण मूल्ये घातलेल्या) तांदळाच्या बाबतीत फोर्टिफिकेशनचा खर्च आणि लागू कर यांनुसार ठरते. हा उपक्रम 9 जुलै 2024 रोजी जाहीर केलेल्या धोरणात सविस्तर मांडला असून तांदळाच्या अतिरिक्त उत्पादनाची पश्चिम विभागातील विविध डेपोंतून विक्री सुलभरित्या करणे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 
S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2052268) Visitor Counter : 49


Read this release in: English