कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय उद्योग महासंघाने संचालक मंडळांसाठी ईएसजी मार्गदर्शक पुस्तिका आणि रेडी रेकनर जारी केले


भारतीय उद्योगांना पर्यावरणीय सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी) संबंधी दृष्टिकोन स्वीकारण्यास मदत करणे हे मार्गदर्शक पुस्तिकेचे उद्दिष्ट

Posted On: 04 SEP 2024 5:07PM by PIB Mumbai

मुंबई, 4 सप्टेंबर 2024

भारतीय उद्योग महासंघाने संचालक मंडळांचे सदस्य आणि स्वतंत्र संचालकांसोबत आयोजित संवादात्मक सत्रात संचालक मंडळांसाठी ईएसजी  मार्गदर्शक पुस्तिका आणि रेडी रेकनर जारी केले. पीडब्ल्यूसी (PwC) च्या भागीदारीत तयार करण्यात आलेली पर्यावरणीय सामाजिक आणि प्रशासनावरील मार्गदर्शक पुस्तिका, ईएसजी आणि भारतातील विहित चौकटी आणि आघाडीच्या जागतिक पद्धती यावर आधारित  शाश्वतता धोरणांचा व्यवहार्य आणि सविस्तर माहिती  संदर्भ प्रदान करते. भारतीय व्यावसायिक उद्योगांना त्यांचे ईएसजी  परिवर्तन साध्य करण्यासाठी त्यांच्या संघटनात्मक रचना, प्रक्रिया आणि कामगिरीत ईएसजी चा अवलंब करण्यास मदत करणे हे मार्गदर्शक पुस्तिकेचे  उद्दिष्ट आहे.

जगभरात ईएसजी परिवर्तनावर अधिक भर दिला जात असल्यामुळे ईएसजी नियमन  आणि मानके विकसित होत आहेत. भारतात, कंपनी व्यवहार मंत्रालय आणि भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ  (सेबी ) यांनी इतरांसह जागतिक मानके स्वीकारली आहेत आणि विशेषतः भारतीय बाजारपेठेसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम तयार केले आहेत. कंपन्यांनी त्या  ज्या अधिकारक्षेत्रात कार्यरत आहेत त्या आधारावर ईएसजी  नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

हे नियम आणि हितधारकांच्या अपेक्षांमुळे कंपन्यांना त्यांच्या  व्यवसाय धोरणात ईएसजी बाबींचा स्वीकार करावा लागला आहे. तसेच जगभरातील संचालक मंडळाने  ईएसजी ला बोर्डरूम चर्चेसाठी महत्त्वाचा अजेंडा म्हणून मान्यता दिली आहे. अनेक भारतीय कंपन्यांसाठी सर्व मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि सामान्यपणे संदर्भित ईएसजी अहवालात एकत्रित केलेली अहवाल मानके समाकलित करण्यासाठी, मार्गदर्शन आणि मदतीची  आवश्यकता भासू शकते.

ही गरज लक्षात घेणे आणि ईएसजीच्या  मूलभूत बाबी स्पष्ट करून सांगणे हे या मार्गदर्शक पुस्तिकेचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला ईएसजी संकल्पनांचा ढोबळ आढावा घेतल्यानंतर ही मार्गदर्शक पुस्तिका ईएसजी व्यवस्था समजून घेण्यास मदत करते आणि अहवालाच्या मूलभूत गोष्टींची विस्तृत माहिती देते.प्रत्येक टप्प्यावर, मार्गदर्शक पुस्तिका संचालक मंडळांना त्यांच्या संस्थांमध्ये आवश्यक अंमलबजावणी करण्यासाठी कृतीयोग्य सूचना  प्रदान करते. यामध्ये चेकलिस्टसह एक ईएसजी रेडी रेकनर देखील समाविष्ट आहे जे संस्थेद्वारे  पद्धती आणि आवश्यकतांचे योग्य पालन होत आहे  की नाही हे सत्यापित करण्यासाठी नियमावली म्हणून काम  करते. या मार्गदर्शक पुस्तिकेद्वारे, मंडळाचे सदस्य जोखीम आणि संधी ओळखू शकतील आणि त्यांच्या संस्थात्मक उद्देशांची नव्याने आखणी करू शकतील आणि त्यांच्या विकास धोरणाचा मुख्य आधारस्तंभ म्हणून ईएसजी  चे एकात्मीकरण  करू शकतील

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2051805) Visitor Counter : 62


Read this release in: English