वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या पत विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी वैविध्यपूर्ण वित्तपुरवठा स्त्रोतांची आवश्यकता: अश्वनी भाटिया, पूर्ण-वेळ सदस्य, सेबी
Posted On:
03 SEP 2024 7:09PM by PIB Mumbai
मुंबई, 3 सप्टेंबर 2024
एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी वित्तीय क्षेत्राने संयुक्त दृष्टिकोन अंगिकारल्यास या क्षेत्राच्या वित्तीय गरजा अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येतील असे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीचे पूर्ण वेळ सदस्य अश्वनी भाटिया, यांनी सांगितले. मुंबईत 2 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या दोन दिवसीय 'वित्तपुरवठा 3.0 परिषद : विकसित भारतासाठी पूर्वतयारी' या कार्यक्रमात ते बोलत होते. "एम एस एम ई क्षेत्राची खरी क्षमता सिद्ध करणे : वित्तपुरवठ्याचे पर्याय" या विषयावरील भाषणात त्यांनी सांगितले की एम एस एम ई क्षेत्राचा वित्तपुरवठा हा पारंपरिक बँकिंग पासून समभागांसारख्या वित्त पुरवठ्याच्या अनेक पर्यायी स्रोतांवर अवलंबून असतो.
एम एस एम ई क्षेत्राला योग्यवेळी आणि किफायतशीरपणे वित्तपुरवठा करण्यात वित्त आणि तंत्रज्ञान हे दोन घटक दुहेरी इंजिन म्हणून कशाप्रकारे उदयास आले आहेत, याबद्दल माहिती देताना, भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग(एमएसएमई) मंत्रालयाचे संयुक्त सचिव, अतीश सिंग म्हणाले की या क्षेत्राची क्षमता सिद्ध करण्यात हे घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतील. या क्षेत्रातील वित्तपुरवठ्यातील तफावत हा सर्वात आव्हानात्मक मुद्दा असून त्यावर समूह अर्थात क्लस्टरच्या माध्यमातून तोडगा काढता येईल तसेच त्यासाठी नवीन जोखीम मूल्यांकन प्रारूपाचा वापर करावा लागेल.

तंत्रज्ञानाचा अवलंब आणि डेटाच्या नवीन आणि मोठ्या स्रोतांच्या उपलब्धतेमुळे झालेले बदल अधोरेखित करताना, मास्टरकार्ड इंडियाचे अध्यक्ष, रजनीश कुमार यांनी सांगितले की या नवीन घडामोडींमुळे कर्जदारांचा 'पैसे परत करण्याचा हेतू' आणि 'पैसे परत करण्याची क्षमता' यातील गणिताचा अंदाज लावता आल्याने संभाव्य नुकसानाचा अंदाज लावण्याच्या वित्तीय संस्थांच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
रिसीव्हेबल एक्सचेंज ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरएक्सआयएल), चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी , केतन गायकवाड यांनी, ट्रेड इनव्हॉइस डिस्काउंटिंग प्लॅटफॉर्मद्वारे झालेल्या वाढीवर प्रकाश टाकला. हे प्लॅटफॉर्म वापरताना त्यातील व्यवहार्यता पाहता या प्लॅटफॉर्मने केवळ एमएसएमईसाठी वित्तपुरवठ्यात सुधारणा केली नाही तर ते कॉर्पोरेट क्षेत्राकडून देखील वाढत्या प्रमाणात स्वीकारले जात आहेत, असे ते म्हणाले.
न्यूक्लियस सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक पराग भिसे यांनी अलीकडच्या काही घडामोडींमध्ये एमएसएमई साठी नवीन वित्तपुरवठा मॉडेल्स आणि ट्रेड रिसीव्हेबल्स इलेक्ट्रॉनिक डिस्काउंटिंग सिस्टीम यासारख्या तंत्रज्ञानाद्वारे बजावलेल्या भूमिकेवर भर दिला.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2051473)
Visitor Counter : 51