ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालय-II तर्फे विज्ञान शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
02 SEP 2024 4:40PM by PIB Mumbai
मुंबई, 2 सप्टेंबर 2024
देशाची राष्ट्रीय मानक संस्था, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस )च्या वतीने दिनांक 29 ते 30 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईतील हॉटेल सन सिटी रेसिडेन्सी येथे विज्ञान शिक्षकांसाठी "मानकांद्वारे विज्ञान शिकणे" या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान शिक्षकांना राष्ट्रीय मानकांबद्दल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात मानकांचे महत्त्व अवगत करुन देणे हा आहे. उपमहासंचालक संजय गोस्वामी आणि शास्त्रज्ञ /वरिष्ठ संचालक आणि बी आय एस मुंबई शाखा कार्यालयाचे प्रमुख संजय विज, यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि शैक्षणिक क्षेत्रातील मानकांच्या महत्त्वावर भर दिला, यासोबतच राष्ट्रीय मानके तयार करण्यासाठी आणि भागधारकांमध्ये त्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय मानक ब्युरो अधोरेखित केले.
प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिक सत्रे, धड्यांशी संबंधित योजना, आणि भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेला भेट अशा उपक्रमांचा समावेश होता. या प्रयोगशाळा भेटीत भारतीय मानक ब्युरोचे उपसंचालक टी. अर्जुन, उपसंचालक अनुराग, उपसंचालक अमन सिंग, आणि मानक प्रोत्साहन अधिकारी पुष्पेंद्र हे देखील सहभागी झाले होते.
राज्यातील सरकारी शाळा आणि खाजगी शाळांमधील विज्ञान शिक्षकांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मानकांबद्दल शिकवण्यासाठी शिक्षकांना 20 पाठ योजना देण्यात आल्या.
हा उपक्रम भारतीय मानक ब्युरोच्या शैक्षणिक संस्थांशी संलग्न होण्याच्या आणि शिक्षणात राष्ट्रीय मानकांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असून या उपक्रमांचा उद्योग आणि ग्राहकांनाचा फायदा होतो.

भारतीय मानक ब्युरोबाबत अधिक माहिती:
भारतीय मानक ब्युरो (BIS) ही एक वैधानिक संस्था आहे जी भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. भारतीय मानक ब्युरो, उत्पादन प्रमाणन (ISI मार्क), मॅनेजमेंट सिस्टम्स सर्टिफिकेशन, सोन्या-चांदीचे दागिने आणि कलाकृतींचे हॉल मार्किंग तसेच प्रयोगशाळा सेवा यासह विविध योजनांचे काम पाहते.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2050923)
Visitor Counter : 46