माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वेव्ह्ज | क्रिएट इन इंडिया चॅलेंज पर्व 1


मनोरंजन क्षेत्राच्या भविष्याची जडणघडण

Posted On: 30 AUG 2024 6:15PM by PIB Mumbai

 

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला चालना देण्यासाठी आणि जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी भारत सरकार वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट (वेव्ह्ज) अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे यजमानपद भूषवण्यास सज्ज होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत, 22 ऑगस्ट 2024 रोजी 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज (भारतातील निर्मिती आव्हान-पर्व 1') अंतर्गत 25 आव्हाने सादर करताना, मनोरंजन अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञानावर भर देत वेव्ह्ज जगभरातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील बंधुत्वाच्या द्योतकासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनण्यास उत्सुक आहे.

भारतातील निर्मिती आव्हान-पर्व 1

या शिखर परिषदेच्या पहिल्या पर्वात ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, प्री अँड पोस्ट प्रॉडक्शन, एआर/एक्सआर/व्हीआर, जनरेटिव्ह एआय, ब्रॉडकास्टींग (प्रसारण), रेडिओ, जाहिरात, समाजमाध्यम, चित्रपट, संगीत, उदयोन्मुख तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील आव्हानांचा समावेश आहे.

ॲनिमेशन आणि गेमिंगपासून ते संगीत आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या आव्हानांची संरचना ही सहभागींना नवीन क्षितिजे गाठण्यासाठी, त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगात भारताच्या विकसित होत असलेल्या गाथेत योगदान देण्यात प्रेरणा देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी केलेली आहे. अनुभवी व्यावसायिकांपासून ते उत्साही शौकीनांपर्यंत, वेव्ह्ज 2024 सर्जनशीलतेला संधी देणाऱ्या आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्याची जडणघडण करणाऱ्या या अनोख्या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्वांना आमंत्रित करते.

या पहिल्या पर्वातील आव्हानांविषयी आणि त्यातील सहभागाच्या निकषांविषयी अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.

WAVES | Create in India Challenge Season 1

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 2050318) Visitor Counter : 55


Read this release in: English , Hindi , Assamese