अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

केएपीएस -4 पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2024 4:04PM by PIB Mumbai

मुंबई, 21 ऑगस्ट 2024

काक्रापार अणुऊर्जा केंद्राचे (केएपीएस 4 – 700 मेगावॅट) युनिट 4 आज 700 मेगावॅटच्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले. 31 मार्च 2024 रोजी व्यावसायिक कार्यान्वयन सुरू केलेल्या युनिटची उर्जा पातळी अणु ऊर्जा नियामक मंडळाच्या (एईआरबी) नियामक प्राधिकरणाच्या परवानगीनुसार वाढविण्यात आली. हे युनिट पूर्ण क्षमतेने सुरू करण्यापूर्वी ते 90% कार्यरत होते.

केएपीएस-4 चे जोड युनिट केएपीएस -3 पूर्ण क्षमतेने सुरळीत कार्यान्वित झाल्यावर ते 700 मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर (पीएचडब्ल्यूआर) संरचनेच्या अशाप्रकारच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या अणुभट्टीची क्षमता दर्शवते. तशीच संरचना असलेल्या आणखी चौदा अणुभट्ट्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत आणि 2031-32 पर्यंत त्या हळूहळू कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय अणुऊर्जा महामंडळ (एनपीसीआयएल) सध्या एकूण 8180 मेगावॅट क्षमतेच्या 24 अणुभट्ट्यांचा ताफा चालवते आणि 6800 मेगावॅट क्षमतेची आठ युनिट्स निर्माणाधीन आहेत. याशिवाय, एकूण 7000 मेगावॅट क्षमतेच्या आणखी 10 अणुभट्ट्या प्रकल्पपूर्व उपक्रमात आहेत. 2031-32 पर्यंत देशातील स्थापित अणुऊर्जा क्षमता 22480 मेगावॅटपर्यंत नेऊन हे उत्तरोत्तर पूर्ण होणे अपेक्षित आहे.


Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2047298) आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English