युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई केंद्राची कुस्तीपटू माधुरी पटेलची राष्ट्रीय स्पर्धेत 23 वर्षाखालील गटात चमकदार कामगिरी
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2024 7:56PM by PIB Mumbai
मुंबई, 19 ऑगस्ट 2024
एसएआय-साई म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओई), मुंबईची समर्पित कुस्तीपटू माधुरी पटेल, हिने हरियाणातील रोहतक येथे झालेल्या 23 खालील राष्ट्रीय स्पर्धेत महिला कुस्ती गटात 50 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले. माधुरी पटेल ही मध्य प्रदेशातील खंडवाचे प्रतिनिधित्व करते. ही स्पर्धा 15 ते 19 ऑगस्ट 2024 दरम्यान झाली. यामध्ये तिची उत्कृष्ट कामगिरी म्हणजे तिच्या परिश्रमाचे मिळालेले फळ आहे. तसेच यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातर्फे मुंबई येथे देण्यात आलेल्या अविरत प्रशिक्षणाचा दाखला आहे.

माधुरीच्या यशाबरोबरच, भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रादेशिक केंद्र, मुंबईचा आखाडा, जय शिवराय शैक्षणिक न्यास, कोल्हापूर येथील कुस्तीपटूंनीही या स्पर्धेत लक्षणीय प्रगती केली. याशिवाय नेहा किरणने 50 किलो गटात रौप्य पदक, अमृता पुजारीने 72 किलो गटात रौप्य पदक आणि तन्वी मगदूमने 57 किलो गटात कांस्य पदक मिळवले.

याप्रसंगी पांडुरंग चाटे (आयआरएस) प्रादेशिक संचालक, एसएआय प्रादेशिक केंद्र, मुंबई, यांनी खेळाडूंचे कौतुक केले. ते म्हणाले "सर्व होतकरू खेळाडूंचे नुकत्याच झालेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील यशाबद्दल अभिनंदन. एसएआय आखाड्यांना सातत्याने मिळाणा-या यशावरून एसएआयने तळागाळातील केंद्रांमध्ये केलेले प्रयत्न दिसून येतात. एसएआयने तळागाळातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रतिभा ओळखण्यावर आणि त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. एसएआयच्या आखाड्यातील अशा आणखी खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल आणि भविष्यात एसएआय- एनसीओई आणि टॉप्स योजनांमध्ये ते निवडले जावेत अशी आमची इच्छा आहे."
* * *
PIB Mumbai | S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2046756)
आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English