दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निर्यातदारांचे सक्षमीकरण : डाकघर निर्यात केंद्र कार्यशाळेचे मुंबईत आयोजन

Posted On: 16 AUG 2024 9:57PM by PIB Mumbai

मुंबई, 16 ऑगस्ट 2024

लहान निर्यातदारांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत,टपाल विभागाने मुंबईत डाकघर निर्यात केंद्र (DNK) या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केली होती. इंडिया पोस्टच्या माध्यमातून लहान निर्यातदारांसाठी सुलभ आणि अधिक कार्यक्षम निर्यात प्रक्रिया सुलभ करणाऱ्या उपक्रमाबद्दल सहभागींना जागरुक करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

डावीकडून उजवीकडेः परेश मेहता, अध्यक्ष, भारतीय निर्यातदार संघटना महासंघ, के. के. शर्मा, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ, सुचेता जोशी, पोस्टमास्तर जनरल, नवी मुंबई

या कार्यशाळेला के. के. शर्मा, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ, आर. के. मिश्रा, डीजीएफटी, सुचेता जोशी, पीएमजी, नवी मुंबई क्षेत्र, परेश मेहता, अध्यक्ष एफआयईओ उपस्थित होते.

आपल्या स्वागतपर भाषणात टपाल सेवा(मेल्स आणि बीडी) संचालक मनोज कुमार यांनी भारताच्या लहान निर्यातदारांना पाठबळ देण्यात डीएनके उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

मुख्य पोस्टमास्तर जनरल के. के. शर्मा यांनी देशभरातील निर्यातदारांच्या व्यवसाय सुलभतेत वाढ करण्याबाबतच्या इंडिया पोस्टच्या बांधिलकीवर भर दिला.

या कार्यक्रमात टपाल विभाग, भारतीय निर्यात संघटना महासंघ (FIEO) आणि रत्ने आणि आभूषणे निर्यात प्रोत्साहन परिषद (GJEPC) यांच्याकडून सादरीकरणे करण्यात आली, ज्यामुळे सहभागींना व्यावहारिक ज्ञान आणि निर्यात नियम आणि संधींबद्दल अद्ययावत माहिती मिळाली.

या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आयआयएम मुंबईच्या मान्यवर अध्यापक वर्गाकडून देण्यात आलेले व्याख्यान, ज्यामुळे सहभागींना सीमेपलीकडील ई-कॉमर्ससाठी हायपर कनेक्टेड लॉजिस्टिक्स नेटवर्कविषयीची अतिप्रगत माहिती मिळाली.

अतिरिक्त डीजीएफटी आर. के. मिश्रा यांच्या मार्गदर्शनामुळे सहभागींचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली.या कार्यशाळेत एका शंका समाधान सत्राचे देखील आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये तज्ञांनी सहभागींच्या प्रश्नांबाबत आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शंकासमाधान केले, यानंतर डीएनके पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सत्राचे आयोजन करण्यात आले.

 

निर्यातदार, उद्योग तज्ञ आणि सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला, ज्यामुळे भारतातील लहान निर्यातदारांच्या विकासाला चालना देण्यासाठी टपाल विभागाच्या वचनबद्धतेला बळकटी मिळाली.

 
N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2046180) Visitor Counter : 48


Read this release in: English