ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाकडून खुल्या बाजारातील विक्री(स्थानिक)योजनेंतर्गत तांदळाची विक्री
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2024 7:23PM by PIB Mumbai
मुंबई, 16 ऑगस्ट 2024
भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने खुल्या बाजारातील विक्री (स्थानिक) योजनेंतर्गत ऑगस्ट 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून तांदळाची विक्री सुरू केली आहे.
तांदळाचा हा साठा खरेदी करण्यासाठी इच्छुक असलेल्या खरेदीदारांनी एफसीआयच्या ई-लिलाव सेवा पुरवठादार “ एम-जंक्शन सर्विसेस लिमिटेड” (https://www.valuejunction.in/fci/) या ठिकाणी स्वतःची पॅनेलमध्ये नोंदणी करावी आणि साठ्यासाठी बोली सादर करावी.खरेदीसाठी इच्छुक असलेल्या कोणत्याही खरेदीदारासाठी पॅनेलमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया 72 तासात पूर्ण केली जाईल. 21.08.2024 रोजी होणाऱ्या आगामी लिलावात गोवा राज्यासह महाराष्ट्र प्रदेशाकरिता एकूण 20,000 मेट्रिक टन तांदूळ खुला केला जाणार आहे.व्यापारी/ मोठ्या साठ्याचे खरेदीदार/ तांदळाच्या पदार्थांचे उत्पादक यामध्ये सहभागी होऊ शकतात. तांदुळासाठी प्रत्येक बोलिदारासाठी बोली लावण्यासाठी किमान एक मेट्रिक टन आणि कमाल 2000 मेट्रिक टनांची मर्यादा आहे.
खुल्या बाजारातील विक्री योजनेमुळे वाढणारे भाव नियंत्रणात राहण्यास आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यास मदत होईल.
स्रोतः एफसीआय
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2046067)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English