संरक्षण मंत्रालय
गोवा तटरक्षक दलाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून 78 वा स्वातंत्र्य दिन केला साजरा
Posted On:
15 AUG 2024 5:35PM by PIB Mumbai
गोवा, 15 ऑगस्ट 2024
गोव्यातील भारतीय तटरक्षक दलाने आज गुरुवार 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राज्यातील विविध एकका अंतर्गत समन्वय साधून एकमेकांशी निगडित अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
या दिवसाचे औचित्य साधून, तटरक्षक दलाच्या कर्मचार्यांनी, तटरक्षक पत्नी कल्याण संघटनेच्या (सीजीडब्ल्यूडब्ल्यूए) सदस्यांनी, डीएससी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी “तिरंगा वॉकथॉन” मध्ये सहभाग घेतला. वॉकथॉनला सीजीडब्ल्यूडब्ल्यूए गोवा अध्यक्ष दीपिका भाटीया यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली.

तटरक्षक दलाने वेंगुर्ला रॉक आणि गोवा किनारपट्टीवर राष्ट्रीय ध्वज फडकावून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा केला. “हर घर तिरंगा” अभियानाचा एक भाग म्हणून शाळांमध्ये जनजागृती सत्रांचे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, दुचाकी रॅली आणि विद्यार्थ्यांना व मच्छिमारांना राष्ट्रीय ध्वजांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात मच्छिमारांनीही उत्साहाने सहभाग घेतला होता.
एकत्रित प्रयत्नांचा एक भाग म्हणून सणाचा उत्साह निर्माण करण्यासाठी, तटरक्षक दलाच्या जहाजांना तिरंग्याच्या झेंड्यांनी सजविण्यात आले.

भारत सरकारच्या आवाहनानुसार, 78 वा स्वातंत्र्य दिन प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावून साजरा करण्यात यावा, या उद्देशाने, तटरक्षक दलाने विविध बेटांवर, निवासी इमारतींमध्ये आणि कार्यालयीन इमारतींमध्ये राष्ट्रध्वज फडकावले. या उपक्रमाचे उद्दिष्ट देशभरात, विशेषत: किनारी राज्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना पसरवणे आणि सामान्य समुदायाशी एक सखोल नाते निर्माण करणे हे होते.
जगातील चौथ्या क्रमांकाच्या भारतीय तटरक्षक दलाने भारतीय किनार्यांचे संरक्षण करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
HQ6P.jpeg)
* * *
PIB Panaji | H.Akude/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2045682)
अभ्यागत कक्ष : 66