शिक्षण मंत्रालय
आयआयएम मुंबई मध्ये स्वातंत्र्य दिन 2024 साजरा
Posted On:
15 AUG 2024 5:10PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2024
भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम), मुंबईने आज आयआयएम मुंबई संकुलात 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नागरिकांच्या बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करत राष्ट्र उभारणी हा वैयक्तिक अनुभव बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून आयआयएम मुंबईने "हर घर तिरंगा" मोहिमेसह भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. आयआयएम मुंबई क्रीडा आणि सांस्कृतिक समितीने मॅरेथॉन, देशभक्तीपर गाणी, फाळणी वेदना स्मृती दिनावर एक छोटेखानी नाटक, नशा मुक्त भारत अभियान यांसारख्या विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

स्वामी विवेकानंद सभागृहात सकाळी 7:00 वाजता कॅम्पस मॅरेथॉनने 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला सुरुवात झाली. विहार तलावासमोरील हिरवळीवर सकाळी 9 वाजता आयआयएम मुंबईचे संचालक प्रा.मनोजकुमार तिवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवत त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले. स्वातंत्र्यलढा तसेच राष्ट्र उभारणीत आपण सगळे कसे योगदान देऊ शकते याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले.
संचालक मंडळाचे अध्यक्ष शशी किरण शेट्टी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, आयआयएम मुंबईने प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) इंडिया क्रमवारी 2024 मध्ये 6 वा क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आयआयएम मुंबईला देशातील आणि जगातील सर्वोत्तम बिझनेस स्कूल बनवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असे त्यांनी नमूद केले. त्यांनी 2023-24 या वर्षातील संस्थेचे शैक्षणिक उपक्रम आणि उपलब्धीचा त्यांनी उल्लेख केला. संस्थेच्या प्रगतीसाठी आगामी योजनांचीही संचालकांनी माहिती दिली.
GDAP.jpeg)
याप्रसंगी ,आयआयएम मुंबईच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कमांडर (सौ.) निशा सिंग यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची प्रतिज्ञा दिली.
त्याचप्रमाणे प्रा.उत्पल चट्टोपाध्याय, अध्यक्ष (विद्यार्थी कल्याण आणि वसतिगृह व्यवस्थापन) आणि प्रा. रौफ इक्बाल, डीन (विद्यार्थी व्यवहार) यांनी नशा मुक्त भारत अभियान आणि अँटी रॅगिंगची प्रतिज्ञा दिली.
मार्च/एप्रिल 2024 मध्ये झालेल्या 10वी/12वी बोर्ड परीक्षेतील कामगिरीबद्दल प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ध्वजारोहण समारंभानंतर संचालकांच्या हस्ते प्रशंसापत्र आणि रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

तसेच, मॅरेथॉन आणि फाळणी वेदना स्मृती दिनावरील लघु नाटकाच्या विजेत्यांना संचालक आणि प्राध्यापकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि पदक देण्यात आले.
कार्यक्रमाला आयआयएम मुंबईचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, पीजीपी आणि सहकारी विद्यार्थी उपस्थित होते. आफताब आलम, AAO ग्रेड 1 (हिंदी), आयआयएम मुंबई यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप मिठाई वाटपाने झाला.
* * *
PIB Mumbai | JPS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2045676)
Visitor Counter : 28