आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निसर्ग ग्राम आणि पुण्‍याच्या राष्‍ट्रीय निसर्गोपचार संस्थेमध्‍ये 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा

Posted On: 15 AUG 2024 3:40PM by PIB Mumbai

पुणे, 15 ऑगस्ट 2024

 

पुणे येथील राष्‍ट्रीय निसर्गोपचार संस्थेमध्‍ये 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीने साजरा केला. हा कार्यक्रम एनआयएन परिसर आणि निसर्ग ग्राम येथे झाला.  यावेळी एनआयएन, पुणेच्या  संचालक प्रा. डॉ. के. सत्या लक्ष्मी यांनी संस्थेचे अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकावला. निसर्ग आरोग्य साधना केंद्राचे डॉक्टर, विद्यार्थी आणि चिकित्सक यांच्या उपस्थितीत राष्ट्राच्या एकात्मतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक असलेला तिरंगा  फडकवण्‍यात आला.

यावेळी तेलंगणा सरकारच्या नेचर क्युअर हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागलक्ष्मी, (आय/सी) विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.   डॉ. नागलक्ष्मी  यांच्या  उपस्थितीमुळे  निसर्गोपचार आणि निरोगीपणाच्या मूल्यांना चालना मिळाली.

यावेळी सहभागींना संबोधित करताना, एनआयएनच्या संचालक, प्रा. डॉ. के. सत्या लक्ष्मी यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी "नशा मुक्त भारत" (ड्रग-फ्री इंडिया) दिलेल्या आवाहनावर प्रकाश टाकला.  या उपक्रमाचे महत्त्व सांगून प्रत्येकाने निरोगी आणि व्यसनमुक्त समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच, यावर्षीच्या मोहिमेनुसार, सर्व निसर्गोपचार रुग्णालयांना "दान पेटी" किंवा देणगी पेटी सादर करावी लागेल, असे सांगितले. या दानपेटीमध्‍ये व्यक्तींना त्यांचा राग, व्देष,  वाईट सवयी (धूम्रपान, दारूचे व्यसन, ताण आणि इतर नकारात्मक भावना इत्यादी) प्रतीकात्मकपणे सोडून देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यामुळे शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे निरोगी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्‍यास मदत होते.

या कार्यक्रमादरम्यान, संचालकांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची आणि ते करीत असलेल्या परिश्रमाची ओळख करून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भारताची एकता आणि विविधतेचे सुंदर चित्रण करणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. औपचारिक कार्यक्रमानंतर, सर्व सहभागींना निरोगी नाश्ता देण्यात आला, या माध्यमातून  संस्थेने  आरोग्य आणि पोषणाच्या मूल्यांचा प्रचार केला.

एनआयएनच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाचा समारोप स्वातंत्र्य, आरोग्य आणि सर्वांगीण कल्याण या मूल्यांच्या नव्या वचनबद्धतेसह मोठ्या उत्साहात झाला. हा कार्यक्रम निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांची आठवण करून देणारा होता,  तसेच  ही संकल्पना साध्य करण्यासाठी निसर्गोपचार भूमिका बजावू शकते, याविषयी सर्वांना माहिती देण्‍यात आली.

 

 

* * *

PIB Pune | M.Iyengar/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045634) Visitor Counter : 43


Read this release in: English