माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारच्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने डोंगरकडा येथे उत्सहात स्वातंत्र्य दिन साजरा


स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्र प्रदर्शन व हर घर तिरंगा अभियानास मोठा प्रतिसाद आयोजन

Posted On: 15 AUG 2024 2:38PM by PIB Mumbai

नांदेड, 15 ऑगस्ट 2024

 

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो व कै. बापूराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंगरकडा ता. कळमनूरी जि. हिंगोली वतीने दिनांक 14 व 15 ऑगस्ट 2024 दरम्यान कै. बापूराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात  स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

15 ऑगस्ट – ध्वजारोहनासह स्वातंत्र्य दिन कार्यक्रम वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सकाळी गावातून विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली  काढण्यात आली. या प्रभात फेरीत जवळपास 800 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून वातावरण निर्मिती केली. यावेळी वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेत राष्ट्रभक्ती व स्वातंत्र्य विरांच्या जयजयकारांच्या घोषणा देत गावात उत्सवाचे वातावरण निर्माण केले. विद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, यावेळी शाहीर प्रकाश दांडेकर यांनी राष्ट्रगीते गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले, विद्यार्थ्य़ांनी राष्ट्रगीत गान स्पर्धा, भाषण स्पर्धा व चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेतला विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके व बक्षिसे  देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फाळणी वेदना समृती दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या चित्र प्रदर्शनात  14 ऑगस्ट 1947 झालेल्या फाळणीच्या वेळी  काढण्यात आलेल्या दूर्मिळ अशा छायाचिंत्राचा समावेश असून फाळणीच्या वेळी जनतेला  करावे लागलेले स्थलांतर आणि त्यातून झालेली जीवित हाणी यांचा या चित्र प्रदर्शात समावेश आहे.

या कार्यक्रमास विद्यालय समिती अध्यक्ष दिलीपराव देसाई, मुख्यध्यापक नितीन बोंद्रे, क्षेत्रीय प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रसिध्दी अधिकारी सुमित दोडल यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.

    

    

    

    

   

* * *

PIB Mumbai | CBC Nanded/M.Jaybhaye/D.Rane

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045601) अभ्यागत कक्ष : 33