आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट : मुंबईतील रस्‍त्यांवर विक्री होणाऱ्या पदार्थांबाबतची सुरक्षितता आणि भेसळ चाचणी वाढविण्यासाठी पुढाकारांवर केली चर्चा

Posted On: 14 AUG 2024 8:31PM by PIB Mumbai

मुंबई, 14 ऑगस्ट 2024


भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी कमला वर्धन राव यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) महापालिका आयुक्त  भूषण वर्षा अशोक गगराणी आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव  डॉ. के.एच. गोविंदराज यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण विषयावर बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्‍ये एफएसएसएआयच्या वतीने खाद्यपदार्थ हाताळणाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लक्षणीय विस्तार करण्‍याबाबत  आणि शहरातील ‘ऑन-द-स्पॉट’  भेसळ शोधून काढण्‍यासाठी जलद चाचणीला प्रोत्साहन देण्‍याविषयी चर्चा केली. तसेच मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छता वाढवण्याच्या धोरणांवर प्रस्तुत चर्चा केंद्रित होती.

 
मुंबईमध्‍ये रस्त्यावर खाद्य पदार्थ  खाण्‍याची असलेली संस्कृती आणि तिचे आर्थिक महत्त्व,यावर  भर देऊन, राव यांनी एफएसएसएआयच्या प्रमुख अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणन (FoSTaC) कार्यक्रमांतर्गत शहरातील प्रशिक्षित अन्न पदार्थ हाताळणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची रूपरेषा सांगितली. शहरामध्ये  विशेषतः रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या बाबतीत  स्वच्छता मानके उंचावण्याच्या उद्देशाने पदपथावरील  पदार्थ  विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले. शहरातील पदपथांवर खाद्य पदार्थांची विक्री करणा-या आणि अन्न व्यवसाय चालक असलेल्या  8 लाखांहून अधिकजणांना आधीच प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे, जी कमला वर्धन राव  यांनी अधोरेखित केले.

 

मुंबईसारख्‍या लोकसंख्येची घनता जास्‍त असलेल्या शहरात जलद आणि सुलभ अन्न सुरक्षा चाचणीची नितांत आवश्‍यकता आहे, हे  ओळखून कमला राव यांनी 'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' (FSWs) म्हणून ओळखल्या जाणारी अतिरिक्त फिरती  अन्न चाचणी वाहने तैनात करण्याचे आश्वासन दिले.या फिरत्या चाचणी वाहनांमुळे  ‘ऑन-द-स्पॉट’  भेसळ चाचणीची  शहराची क्षमता वाढवतील, वेळेवर आणि प्रभावी अन्न सुरक्षा तपासणी  सेवा प्रदान करतील. हा उपक्रम एफएसएसएआयच्या सुरू असलेल्या देशव्यापी उत्सवपूर्व  देखरेख ठेवण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे.या उपक्रमामुळे नागरिकांनी खाल्लेले अन्न सुरक्षित आणि दूषित पदार्थांपासून मुक्त असल्याची खात्री  करून घेणे शक्य होते.

या बैठकीत  मुंबईतील रस्त्यांवर आरोग्यदायी आणि स्वच्छ अन्न  विक्री केली जावी,यासाठी संभाव्य विकासाबाबत मुख्‍य कार्यकारी अधिका-यांनी  पालिका आयुक्तांशी चर्चा केली. या उपक्रमाचे उद्दिष्ट  काही विशिष्‍ट क्षेत्रांची निवड करणे असेही आहे. निवडलेल्या या क्षेत्रांमध्‍ये रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते कठोर स्वच्छता मानकांनुसार काम करू शकतील आणि मुंबईकरांना आणि पर्यटकांना सुरक्षित आणि स्वादिष्ट भोजन देऊ शकतील.

मुंबईतील शाळांमधील ‘हेल्थ क्लब’चा प्रचार हा या बैठकीचा आणखी एक महत्त्वाचा विषय होता. लहानपणापासूनच निरोगी खाण्याच्या सवयी आणि अन्न सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर जी कमला  राव यांनी भर दिला. यामुळे  शहरातील आरोग्याबाबत जागरूक पिढीचे संगोपन करण्‍याचे काम होऊ शकेल.

या  बैठकीमुळे एफएसएसएआयची  स्थानिक प्राधिकरणांसोबत जवळून काम करण्याची वचनबद्धता अधोरेखित होते.त्यामुळे  मुंबई सारख्या शहरांना  केवळ त्यांच्या समृद्ध खाद्य परंपरा जपता येतील  असे नाही, तर भारतातील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचा मापदंड देखील स्थापित करणे शक्य होणार  आहे.


S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2045435) Visitor Counter : 80


Read this release in: English