मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा आणि केरळच्या नोडल अधिकाऱ्यांसाठी मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयातर्फे पणजी येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 12 AUG 2024 4:12PM by PIB Mumbai

गोवा, 12 ऑगस्ट 2024

 

गोवा आणि केरळच्या राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांसाठी मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयातर्फे पणजी मधील हॉटेल फिदाल्गो येथे मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 रोजी 21 वी पशुधन गणना, सॉफ्टवेअर प्रादेशिक विशिष्ट निपज याविषयी एक दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास राज्यमंत्री प्रा. एस पी सिंह बघेल आणि गोवा सरकारचे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा मंत्री नीलकंठ हलर्णकर या संमेलनाला संबोधित करतील.

पशुविकास आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव आयएएस अलका उपाध्याय; गोवा सरकारच्या पर्यावरण, पशुविकास आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे सचिव आयएएस अरुण कुमार मिश्रा आणि इतर उच्चाधिकारी देखील प्रशिक्षण सत्राचा भाग म्हणून मेळाव्याला संबोधित करतील.

या कार्यशाळेत 21व्या पशुधन गणनेचे वेळापत्रक; गोवा आणि केरळमधील विशिष्ट निपज विषयी सादरीकरण; वापरकर्ता अधिकारपत्रे, प्रगणक आणि पर्यवेक्षक यावर चर्चा आणि मोबाईल ऍप्लिकेशन आणि डॅशबोर्डवरील प्रशिक्षण यावर विचारमंथन होईल.

 

* * *

PIB Panaji | S.Patil/V.Joshi/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(रिलीज़ आईडी: 2044559) आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English