संरक्षण मंत्रालय
आयएनएस चिल्कावर अग्निविरांच्या चौथ्या तुकडीचे दीक्षांत संचलन
Posted On:
10 AUG 2024 4:06PM by PIB Mumbai
एक महत्वाचा टप्पा गाठत भारतीय नौदलाच्या आयएनएस चिल्का येथून 9 ऑगस्ट 24 रोजी नौदलाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून 214 महिला अग्नीविरांसह एकूण 1389 अग्निवीर उत्तीर्ण झाले .
सूर्यास्तानंतर आयोजित दिमाखदार सोहळ्यात अग्निवीरांच्या चौथ्या तुकडीने (01/24) केलेले दीक्षांत संचलन, 16 आठवड्यांच्या कठोर नौदल प्रशिक्षणाचा कळसाध्याय ठरला. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी या संचलनाचे निरीक्षण केले. सदर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ॲडमिरल व्ही श्रीनिवास संचलन अधिकारी होते. ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर हे देखील यावेळी उपस्थित होते.
Best All Round AVR (SSR)
Best All Round Agniveer (MR)
दीक्षांत संचलन हे केवळ प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सूचित करत नसून, भारतीय नौदलात अग्निवीरांच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात देखील दर्शवते.
दीक्षांत संचलनाला संबोधित करताना नौदल प्रमुखांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल अग्नीवीरांच्या तुकडीचे अभिनंदन केले, आणि राष्ट्र उभारणीच्या कर्तव्याचा पाठपुरावा करताना नौदलाच्या, ‘कर्तव्य, सन्मान आणि साहस ’ या मूलभूत मूल्यांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी प्रशिक्षणाच्या पुढील टप्प्यांवर लक्ष केंद्रित करावे आणि तांत्रिकदृष्ट्या निपुण सागरी योद्धे बनावे असे त्यांनी आवाहन केले.
दीक्षांत संचलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत अग्निवीरांना पदक आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले. नौदल प्रमुखांनी चिल्का वॉर मेमोरियल येथे शूरवीरांना आदरांजली अर्पण केली.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044105)
Visitor Counter : 63