सांस्कृतिक मंत्रालय
‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होऊन देशवासीयांनी मोठ्या अभिमानाने आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवावा, आणि आपला सेल्फी शेअर करावा असे सांस्कृतिक मंत्रालयाचे आवाहन
राष्ट्रध्वजाप्रति असलेले आपले प्रेम वक्त करण्यासाठी नागरिकांनी या सोहळ्यात सक्रीय सहभाग नोंदवावा: नागपूर येथील दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्राचे प्रभारी संचालक के.के.गोपालकृष्णन
Posted On:
09 AUG 2024 4:18PM by PIB Mumbai
देशभरात स्वातंत्र्य दिनाची मोठ्या उत्साहात तयारी सुरु असून, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरुवात केली आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी होऊन मोठ्या अभिमानाने आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवावा, आणि harghartiranga.com वर आपला सेल्फी शेअर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रध्वजाप्रति असलेले आपले प्रेम वक्त करण्यासाठी नागरिकांनी या सोहळ्यात सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन नागपूर येथील दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्राचे (एससीझेडसीसी) प्रभारी संचालक के.के.गोपालकृष्णन यांनी केले आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियान हे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा एक भाग असून, आपला तिरंगा ध्वज घरोघरी फडकावण्याच्या उद्देशाने ते आखले गेले आहे. सर्वसामान्यपणे राष्ट्राध्वजाशी असलेले आपले नाते अधिक औपचारिक आणि संस्थात्मक राहले आहे. या अभियानाच्या माध्यमातून या नात्याला वैयक्तिक बनवण्याचा प्रयत्न असून, यामधून राष्ट्र उभारणी आणि देशभक्तीप्रति असलेली आपली वचनबद्धता प्रतिबिंबित होते.
या अभियानात सहभागी होऊन आपण केवळ राष्ट्र ध्वजाचा सन्मान करत नसून, राष्ट्रीय एकता आणि अभिमानाच्या भावनेला बळ देत आहोत.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2043752)
Visitor Counter : 46