संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचे जहाज तबर चार दिवसांच्या भेटीसाठी ब्रिटनमधील लंडन येथे दाखल
Posted On:
08 AUG 2024 7:17PM by PIB Mumbai
मुंबई, 8 ऑगस्ट 2024
भारतीय नौदलाची फ्रिगेट आयएनएस तबर चार दिवसांच्या भेटीसाठी 07 ऑगस्ट 24 रोजी लंडन बंदरात दाखल झाली आहे. भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही यांच्यात ऐतिहासिक संबंध असून ते अलिकडच्या दशकात आणखी दृढ होत आहेत. दोन्ही देशांची जहाजे नियमितपणे एकमेकांच्या देशांना भेट देत आहेत आणि वरचेवर विविध नौदल सरावांमध्ये एकत्र सहभागी होत आहेत.दोन्ही देशांच्या नौदलांनी गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कोकण नावाच्या द्विपक्षीय नौदल सरावासाठी दीर्घकालीन भागीदारी देखील केली आहे.

आयएनएस तबरच्या लंडन बंदरातील चार दिवसांच्या मुक्कामादरम्यान भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही यांच्यात व्यावसायिक संवादांची मालिका नियोजित आहे. आयएनएस तबरवरचे कर्मचारी दल,रॉयल आर्मीतील निवृत्त सैनिकांच्या वृद्धाश्रमात सामुदायिक सेवा देखील प्रदान करणार आहेत. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही विचारसरणी अधोरेखित होते.या उपक्रमातून विशेषत: दोन्ही देशांमधील सागरी क्षेत्रात द्विपक्षीय संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी प्राप्त होत आहे.

46H3.jpeg)
आयएनएस तबर ही भारतीय नौदलासाठी रशियामध्ये बांधण्यात आलेली फ्रिगेट आहे.या जहाजाचे नेतृत्व कॅप्टन एम आर हरीश यांच्याकडे आहे आणि या जहाजावर जवळपास 280 कर्मचारी कार्यरत आहेत. हे जहाज विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्सच्या अष्टपैलू श्रेणीने सुसज्ज असून भारतीय नौदलाच्या सुरुवातीच्या फ्रिगेटपैकी एक आहे. हे जहाज भारतीय नौदलाच्या मुंबई येथील पश्चिमी नौदल कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या पश्चिमी नौदल ताफ्याचा भाग आहे.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2043316)
Visitor Counter : 72