अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीजीएसटी पुणे आयुक्तालयाने बनावट चलन आणि बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरण उघडकीस आणले

Posted On: 06 AUG 2024 5:22PM by PIB Mumbai

पुणे, 6 ऑगस्ट 2024

सीजीएसटी पुणे-II आयुक्तालय,  पुणे झोनच्या कर चोरी विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून, अवैध इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) पास करणाऱ्या विविध बनावट/बोगस कंपन्यांवर बनावट पावत्या जारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या या कंपन्या एका विशिष्ट समूहातर्फे चालवल्या जात होत्या. या साखळीत वस्तू आणि सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता फसव्या पावत्यांद्वारे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या सरकारी कंत्राटदारांचा देखील समावेश आहे. या प्रकरणात एकूण 20 कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून फसवणूक करण्यात आली आहे. आतापर्यंत यापैकी 3.25 कोटी रुपये वसूल करण्यात आले.

या प्रकरणातचे सूत्रधार असलेल्या पुण्याच्या दोन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या सर्व कटकारस्थानात या समूहाने बनावट चलन व्यवहारात गुंतलेल्या सरकारी कंत्राटदाराच्या संगनमताने औपचारिक आणि अनौपचारिक बँकिंग चॅनेलचा वापर केल्याचे तपासाअंती सकृतदर्शनी समोर आलेल्या पुराव्यांवरून दिसून येत आहे.

बनावट इनव्हॉइस ट्रेडिंग बाबत होणारी फसवणूक पूर्णपणे रोखण्यासाठी विभाग वचनबद्ध आहे.


M.Iyengar/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2042222) Visitor Counter : 96


Read this release in: English