दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा उच्च न्यायालयातील उप टपाल कार्यालयाचे उद्घाटन
Posted On:
04 AUG 2024 10:20AM by PIB Mumbai
पणजी, 4 ऑगस्ट 2024
भारतीय टपाल सेवेच्या गोवा टपाल विभागाने शनिवार, 03.08.2024 रोजी गोव्यातील पर्वरी येथे मुंबई उच्च न्यायालयात उप टपाल कार्यालय उघडले असून या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती भारत पी. देशपांडे आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस उपस्थित होते.
या कार्यक्रमात, उच्च न्यायालयातील उप टपाल कार्यालयाच्या ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत बँक खात्यांच्या पासबुकचे वाटप करण्यात आले.
गोवा विभागाच्या पणजी टपाल सेवा संचालक रमेश पी. पाटील देखील या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. हे नवीन उप टपाल कार्यालय उच्च न्यायालयातील कर्मचारी, कायदे व्यवसायी आणि जनतेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आखण्यात आलेल्या टपाल सेवांची सर्वसमावेशक मालिका प्रदान करेल, असे पाटील यांनी सांगितले.
उद्घाटनाला सोहळ्याला टपाल सेवेच्या गोवा विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल. एन राव यांच्यासह गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रवीण एन. फळदेसाई, वरिष्ठ वकील तसेच उच्च न्यायालय बार असोसिएशनचे गोवा विभागाचे अध्यक्ष जे. कोएल्हो परेरा, केंद्र सरकारचे स्थायी वकील (CGSC) रविराज चोडणकर, इतर मान्यवर तसेच उच्च न्यायालय आणि टपाल विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गोवा उच्च न्यायालयात उप टपाल कार्यालय उघडल्याने या महत्त्वपूर्ण न्यायिक परिसरात टपाल सेवांच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे संपूर्ण कार्यक्षमतेने आणि सोयीस्कररीत्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या टपाल विभागाच्या बांधिलकीला बळकटी मिळाली आहे.
***
JPS/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2041258)
Visitor Counter : 56