वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आसियान-भारत मालव्यापार करार संयुक्त समितीची जकार्ता येथे पाचवी बैठक

Posted On: 03 AUG 2024 12:44PM by PIB Mumbai

 

आसियान आणि भारत यांच्यामधील आर्थिक सहकार्यसंबंधीचा मैलाचा दगड असलेली आसियान भारत माल व्यापार करारासंबधित संयुक्त समितीची पाचवी बैठक इंडोनेशियात जकार्ता येथे 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत झाली.

केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि मलेशियाच्या गुंतवणूक, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाच्या उप महासचिव (व्यापार) मस्तुरा अहमद मुस्तफा, या बैठकीचे सह-अध्यक्ष होते. भारत आणि सर्व 10 आसियान देशांच्या  प्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेतला.

AITIGA चा आढावा घेण्यासाठी मे 2023 मध्ये एआयटीआयजीए (AITIGA) च्या संयुक्त समितीची चर्चा सुरू झाली. पुनरावलोकनाच्या वाटाघाटी  संदर्भात आणि वाटाघाटींचा आराखडा निश्चित केल्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये AITIGA संयुक्त समिती आणि उप समित्यांच्या वाटाघाटी फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाल्या.

नवी दिल्लीत फेब्रुवारी 2024 मध्ये आणि मे 2024 मध्ये मलेशियातील पुत्रंजया येथे अशा वाटाघाटींच्या पहिल्या दोन फेऱ्या पार पडल्या. इंडोनेशियातील जकार्ता येथे तिसऱ्या फेरीतल्या ‘राष्ट्रीय मांडणी आणि बाजारपेठेची उपलब्धता’, ‘मूळ नियम’, ‘मानके तांत्रिक नियमन आणि अनुरूप मूल्यांकन प्रक्रिया’ ‘स्वच्छता आणि वनस्पती आरोग्य विषयक समिती’, ‘कायदेशीर आणि संस्थात्मक बाबी’ , ‘सीमा विभागाच्या प्रक्रिया’ आणि ‘व्यापार सुलभता, व्यापार उपाययोजना’, आणि ‘आर्थिक व तांत्रिक  सहकार्य’ यासंबंधीच्या आठ उपसमित्यां पाचव्या AITIGA च्या संयुक्त समितीत सहभागी झाल्या आणि त्यांनी वस्तुनिष्ठ चर्चा करत या फेरीमध्ये बरीच प्रगती केली. सर्व उपसमित्यांनी पाचव्या AITIGA संयुक्त समितीमधील चर्चेचा पुढील कामासाठी मार्गदर्शक असा अहवाल तयार केला.

AITIGA संयुक्त समितीच्या पाचव्या बैठकीबरोबरच भारताच्या नेतृत्वाखालच्या  शिष्टमंडळाने AITIGAचा आढावा घेताना तिथे चर्चा झालेल्या गोष्टींवर एकसमान दृष्टिकोन होण्यासाठी मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, आणि व्हिएतनाम या सहभागी देशांबरोबर द्विपक्षीय विशेष बैठकाही घेतल्या. आसियानचे महासचिव डॉक्टर काओ किम हार्न व आसियानचे उपसचिव सतविंदर सिंग यांच्यामध्ये भारत आणि आसियन यांच्यामधील आर्थिक सहकार्य वाढवण्यासंबंधीच्या शक्यतांवर चर्चा झाली.

आसियान हा भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे आणि भारताच्या जागतिक व्यापारात त्याचा अकरा टक्के वाटा आहे. वर्ष 2009 मध्ये स्वाक्षरांकित झालेला AITIGA आढावा व्यापारातील पुढील संधी तयार करण्यासाठी दोन्ही बाजूंना मदत करेल पर्यायाने भारत आसियान व्यापाराचा स्तर उंचावेल. AITIGA संयुक्त समितीची पुढची बैठक भारतात 19 ते 22 नोव्हेंबर 2024 मध्ये होणार आहे.

***

H.Akude/V.Sahajrao/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2041123) Visitor Counter : 72