वस्त्रोद्योग मंत्रालय
येत्या 7 ऑगस्ट 2024 रोजी 10 वा राष्ट्रीय हातमाग दिवस केला जाणार साजरा
हातमाग उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच हातमाग विणकरांची प्रतिष्ठा वाढवण्याच्या हेतूने हातमाग विकास आयुक्त करणार विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागरिकांमध्ये हातमाग उत्पादने लोकप्रिय करण्यासाठी मुंबईतील विणकर सेवा केंद्र अनेक उपक्रम आयोजित करणार
Posted On:
31 JUL 2024 3:25PM by PIB Mumbai
मुंबई, 31 जुलै 2024
हातमाग उद्योगाचे महत्त्व आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात हातमाग उद्योगाचे योगदान याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 2015 पासून दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ साजरा केला जातो. हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देणे, विणकरांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांच्या कामाची प्रतिष्ठा वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा प्रघात पुढे चालू ठेवत, नवी दिल्लीतील हातमाग विकास आयुक्त कार्यालयाने आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये एक खास प्रदर्शन, समाज माध्यम मोहीम, लघुपट किंवा माहितीपटाचे प्रदर्शन आणि देशभरात इतर समर्पक कार्यक्रमाचे आयोजन यांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या मुख्य दिवसाचा कार्यक्रम 7 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. या दिवशी हातमाग उद्योगाच्या प्रचारासाठी तसेच हातमाग उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या वर्षी हातमाग दिनानिमित्त देशातील विणकर सेवा केंद्रांद्वारे (WSCs) प्रमुख 75 हातमाग क्लस्टर्स किंवा विभागामध्ये, स्थानिक खासदार, आमदार, डिझाइनर, पुरस्कार विजेते, विणकर आणि इतर भागधारकांच्या उपस्थितीत हातमाग उत्पादनांच्या प्रचारार्थ कार्यक्रम सादर केले जातील. हातमागांना प्रोत्साहन देणे, हातमाग उद्योग क्षेत्राला पाठिंबा देणे आणि हातमाग विणकरांची प्रतिष्ठा वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.
नागरिकांमध्ये हातमागाची लोकप्रियता वाढवण्याच्या उद्देशाने, वस्त्रोद्योग मंत्रालयातील विकासायुक्त हातमाग विभाग हे कार्यालय , या वर्षीच्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून MyGov पोर्टलवर खालील उपक्रम आयोजित करत आहेत.
MyGov पोर्टलवर नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत:
- हातमाग प्रश्नमंजुषा स्पर्धा : 7 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित केली जाईल
- भारतीय हातमाग उत्पादने वापरण्याबाबतची प्रतिज्ञा: https://pledge.mygov.in/indian-handloom-2024/ या संकेतस्थळावर 16 जुलै ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत घेता येईल
- सेल्फी स्पर्धा : भारतीय हातमागावर निर्मित पेहरावात काढलेला सेल्फी -- 16 जुलै ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://www.mygov.in/task/selfie-indian-handloom/ या संकेतस्थळावर अपलोड करता येईल
- सोव्हेनियर निर्मिती : हातमाग उत्पादनाचा वापर करून स्मरणिका डिझाइन करा- 16 जुलै ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://www.mygov.in/task/design-handloom-souvenir/ या संकेतस्थळावर
याच अनुषंगाने, विणकर सेवा केंद्र, मुंबई च्या वतीने 10 वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यासाठी सोलापूर येथील श्री परमेश्वर विठोबा मोने हॉल, 18/11, माधवनगर, एमआयडीसी रोड, राघवेंद्र टॉवर समोर. सोलापूर-413006 येथे 7 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 09.00 ते संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दिवशी होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
- हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रमुख उपक्रमाचा प्रसार (ब्लॉक स्तरावरील क्लस्टर, भारतीय हातमाग ब्रँड, हातमाग मार्क, मुद्रा योजना, विमा योजना, ई-कॉमर्स, ई-धगा, जीआय इ.)
- स्थानिक यशोगाथांचे सादरीकरण
- विणकरांशी संवाद
- विणकर सेवा केंद्र मुंबईच्या डिझाइन, नमुने आणि उत्पादनांचे प्रदर्शन.
या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते, संत कबीर पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र धारक याशिवाय डिझायनर्स, संपूर्ण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग आणि विणकर सहकारी संस्थांशी संबंधित राज्य संघटना आणि स्थानिक प्रतिनिधी आणि नगरसेवक यांचाही समावेश असेल.
* * *
PIB Mumbai | JPS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2039590)