दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पेन्शन अदालतचे आयोजन
Posted On:
29 JUL 2024 7:48PM by PIB Mumbai
नवी मुंबई, 29 जुलै 2024
टपाल विभागाच्या पेन्शन/ कौटुंबिक पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींसाठी (जे नवी मुंबई विभागाअंतर्गत टपाल कार्यालयातून निवृत्त झाले अथवा या विभागातून निवृत्तीवेतन घेतात) पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई विभाग, पनवेल,यांच्याद्वारे 21.08.2024 रोजी सकाळी 11 वाजता, पोस्टमास्टर जनरल, नवीमुंबई विभाग ,यांचे कार्यालय, दुसरा मजला, पनवेल प्रधान टपाल कार्यालय इमारत, नवीन पनवेल, रायगड 410 206 येथे डाक पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. पेन्शन/कौटुंबिक पेन्शन घेणाऱ्या व्यक्तिंनी आपले अर्ज खाली दिलेल्या नमुन्यामध्ये लेखा अधिकारी, पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई विभाग यांचे कार्यालय, दुसरा मजला, पनवेल मुख्य पोस्ट ऑफिस इमारत नवीन पनवेल रायगड 410206 ह्या पत्त्यावर दिनांक 12.08.2024 पर्यंत मिळतील अशा रीतीने पाठवावेत. दिनांक 12.08.2024 ह्या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा पेन्शन अदालत मध्ये अंतर्भाव केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. पेन्शन अदालत मध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे, जसे की वारसा प्रमाण पत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतन श्रेणी वृद्धी आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी. पी .सी च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.
भारतीय टपाल विभाग
टपाल पेन्शन अदालतच्या अर्जाचा नमुना
क्रमसं.
|
विषय
|
पेन्शन / परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींकडून भरला जाणारा तपशील
|
1.
|
पेन्शन / कौटुंबिक पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचे नांव
सेवानिवृत्ती/मृत्यु वेळीचा हुद्दा
|
|
2.
|
जिथून सेवानिवृत्त झाले त्या कार्यालयाचे नाव आणि सेवानिवृत्तीची तारीख
|
|
3.
|
पीपीओनंबर
|
|
4.
|
पेन्शन घेत असलेल्या टपाल कार्यालयाचे नांव
|
|
5.
|
पेन्शन / कौटुंबिक पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचा घरचा पत्ता फोननंबरसहित
|
|
6.
|
थोडक्यात तक्रार (आवश्यक असल्यास विवरण जोडावे)
|
|
7.
|
पेन्शन / कौटुंबिक पेन्शन व्यक्तींची सही आणि तारीख
|
N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2038730)
Visitor Counter : 56