ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोने गुणवत्ता तपासणी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे केले आयोजन
Posted On:
29 JUL 2024 7:03PM by PIB Mumbai
मुंबई, 29 जुलै 2024
आपल्या सध्याच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून,भारतीय मानक ब्युरो च्या (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड,BIS) मुंबई शाखेने आपल्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयात, घरगुती आणि तत्सम उद्देशाने, वापरण्यात येणाऱ्या स्विचेसच्या गुणवत्ता चाचणीसाठीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ,25 आणि 26 जुलै 2024 रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम (कॅप्सूल कोर्स) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) अंधेरी, येथील बीआयएसच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय चाचणी गृह प्रयोगशाळेत प्रशिक्षण कार्यक्रम उपक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाच्या उदघाटनपर भाषणादरम्यान,संचालक आणि प्रमुख, मुंबई शाखा कार्यालय -II येथील शास्त्रज्ञ आणि एफ दर्जाचे वरीष्ठ अधिकारी संजय विज,यांनी सहभागींचे स्वागत केले, कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची रूपरेषा सांगितली आणि बीआयएसने हाती घेतलेले नवीन उपक्रम आणि बीआयएस द्वारे चालवले जाणारे मानक प्रोत्साहन उपक्रम यांची थोडक्यात माहिती दिली.

दोन दिवसीय अभ्यासक्रमादरम्यान उपसंचालक, मुंबई शाखा कार्यालय -II, येथील शास्त्रज्ञ आणि सी दर्जाचे वरीष्ठ अधिकारी वैज्ञानिक अधिकारी टी. अर्जुन, यांनी भारतीय मानक IS 3854:2023 यानुसार - घरगुती आणि तत्सम हेतूंसाठी,स्विचेसचे नमुने तयार करणे आणि नमुन्यांची कंडिशनिंग, उत्पादन पुस्तिकेतील माहिती आणि स्पष्टीकरण यासह चाचण्या ,अधियोग्यता आणि इतर विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि नोंद ठेवणे, परवान्यासाठी अनुदान/समावेश/नूतनीकरण/ऑपरेशन यासाठी मार्गदर्शक तत्त्वे समजून घेणे, ऑनलाइन पोर्टल Manakonline आणि e-BIS ची वैशिष्ट्ये,अशा .विविध आवश्यक बाबींची माहिती दिली. महत्त्वाच्या मानक चाचणीच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासाठी प्रयोगशाळेला भेटी देखील घेण्यात आल्या.तसेच वरील विषयांवर प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेण्यात आल्या.

सर्व सहभागींकडून अभिप्राय देखील घेण्यात आणि बीआयएसने घेतलेल्या या उपक्रमाद्वारे चाचणी पद्धतीच्या विविध पैलूंविषयी सहभागींचे ज्ञान अद्ययावत करण्यात आले.
भारतीय मानक ब्युरो हे बीआयएस कायदा 2016 या अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. बीआयएसचे मुख्य कार्य म्हणजे मानकाच्या कक्षा निश्चित करणे,फॉर्म्युलेशन, उत्पादन प्रमाणन, प्रयोगशाळा चाचणी आणि प्रणाली प्रमाणन या आहेत.बीआयएस सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार वस्तू पुरवून, ग्राहकांच्या आरोग्याला असलेला धोका कमी करून, पर्यावरणाचे संरक्षण करून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत उत्तम योगदान देत आहे. बीआयएसची मानक आणि उत्पादन प्रमाणन योजना ग्राहक आणि उद्योगांना लाभदायी होण्यासह, विशेष करून उत्पादन सुरक्षा, ग्राहक संरक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, इमारत आणि बांधकाम इ.विविध सार्वजनिक धोरणांना समर्थन देते.

स्रोत:मुंबई शाखा कार्यालय, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्स (Mumbai Branch Office, Bureau of Indian Standard)
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2038706)
Visitor Counter : 63