अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमाशुल्क विभागानं गेल्या दोन आठवड्यात मुंबई विमानतळावर 20 किलो सोने, गांजा आणि विदेशी चलन केले जप्त

Posted On: 28 JUL 2024 8:56PM by PIB Mumbai

 

विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन-III ने 13.11 कोटी रूपये किमतीचे 20.18 किलोपेक्षा जास्त सोने, 4.98 किलो गांजा (मारिजुआना) आणि  96 लाख रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केले आहे.  15-27 जुलै 2024 दरम्यान 39 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये  मेणातील सोन्याची धूळ, अंतिम हात न फिरवलेले दागिने आणि सोन्याचे बार अशा विविध स्वरूपातील सोने पुठ्ठ्याचे बॉक्स, कागदांचे गठ्ठे, बुटांचे सोल यात लपवलेले आढळले. अशा पद्धतीने शरीरात सोने लपवलेल्या सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीच्या वसंत विहार येथील रहिवासी असलेल्या एका भारतीयाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या चेक-इन बॅगेजमध्ये प्लास्टिकच्या 14 एकसमान पारदर्शक पाकिटात गांजासदृश (मारिजुआना)  हिरवट रंगाचा पदार्थ तीन लहान कार्डबोर्ड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला आढळून आला. हा पदार्थाचे वजन 4977 ग्रॅम होते. दुबईहून 2, जेद्दाहहून, शारजाह, कोलकाता आणि अहमदाबादमधून आलेल्या प्रत्येकी एक अशा सहा भारतीय नागरिकांकडे 24 कॅरट सोन्याची धूळ, 24 कॅरट गोल्ड बार आणि 24 कॅरट सोन्याची तार रोडियम आढळून आली. त्यांचे एकूण वजन 7160 ग्रॅम होते. वायरमधील सामानाभोवती, एलईडी ड्रायव्हर्सच्या प्लास्टिक केसेसमध्ये आणि शरीरात ते लपवून ठेवले होते. या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय, दुबई (03) आणि कोलंबो (01) येथून आलेल्या  चार परदेशी नागरिकांना रोखण्यात आले आणि त्यांच्याजवळ विजारी (पॅन्ट)च्या खिशात, तसेच सामानवाहू हातगाड्यांमध्ये (ट्रॉली) लपवून ठेवलेली एकूण 1197.00 ग्रॅम वजनाची 24 कॅरट सोन्याची पूड आणि सोन्याच्या लडी, असा ऐवज सापडला.

दुबई (12), बहरीन (02), दोहा (02), हाँगकाँग (01), शारजा (01), सिंगापूर (01), बँकॉक (01), अबू धाबी (01) आणि जेद्दाह (01) येथून आलेल्या 22 भारतीय नागरिकांना  रोखण्यात आले. त्यांच्यापाशी, 7685.00 ग्रॅम सोने आणि 30 आय-फोन असा एकूण 44,92,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. हा माल चप्पलच्या तळव्याच्या आत, कागदाच्या दोन थरांमध्ये, दोन PS-4 गेमिंग कन्सोलच्या मदरबोर्डच्या खाली, सामान वाहून नेणाऱ्या हातगाडीच्या पुढील चाकाजवळ आणि शरीरावर लपवून ठेवलेल्या अवस्थेत होता.

एअर इंडिया एक्स्प्रेस IX-252 आणि IX-296 या विमानांच्या सीमाशुल्क तपासणी  दरम्यान, 4140.000 ग्रॅम एकूण निव्वळ वजनाची, 2,70,47,655 रुपये किंमतीची, मेणातील 24 कॅरट सोन्याची पूड (05 पुड्या) सापडली. हा ऐवज, विमानातील आसनांच्या पोकळ नळकांड्यांमध्ये आणि आसनांच्या खाली असलेल्या कप्प्यांमध्ये लपवून ठेवलेला आढळून आला.

सिंगापूर, अबुधाबी आणि बँकॉक येथे जाणाऱ्या 8 भारतीय नागरिकांना रोखण्यात आले. त्यांच्यापाशी 62500 युरो, 50,000 अमेरिकी डॉलर,  25210 थाई बाथ आणि 97 सिंगापूर डॉलर, असे एकूण 96,41,993 रुपयांचे परकीय चलन सापडले. हे चलन या प्रवाशांनी, चेक इन बॅगेज (विमानात बसताना जवळ न बाळगता येणारे स्वतःचे सामान) मधल्या भांड्यांमध्ये, चपलांच्या  तळव्यांखाली आणि पापडाच्या थरांमध्ये लपवले होते.

***

S.Patil/P.Jambhekar/A./Save/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2038187) Visitor Counter : 106


Read this release in: English