दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागाने कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष तिकीट केले जारी
Posted On:
27 JUL 2024 1:28PM by PIB Mumbai
गोवा टपाल विभागाने कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त 26 जुलै 2024 रोजी शुक्रवारी पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतीय नौदलाचे कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) आणि टपाल सेवा (गोवा प्रदेश), पणजी’चे संचालक रमेश पी. पाटील यांच्या हस्ते विशेष तिकीट जारी केले.
कमांडर जीपीएस बाजवा (सेवानिवृत्त) यांनी आपल्या भाषणात कारगिल युद्धात भारतीय नौदलाने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली तसेच युद्धादरम्यानचे आपले विचार आणि अनुभवही सामायिक केले.
गोवा विभाग, पणजी येथील टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल. एन. राव, टपाल सेवा-l, गोवा प्रदेश, पणजी’चे सहाय्यक संचालक संजय देसाई, गोवा स्थित राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ. एम. आर. रमेश कुमार, आणि टपाल विभागाचे कर्मचारी या प्रकाशन समारंभाला उपस्थित होते.
डॉ. एम. आर. रमेश कुमार, हे एक टपाल तिकीट संग्राहक देखील आहेत आणि त्यांनी कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पणजी टपाल मुख्यालयाच्या समोर फिलाटली ब्युरो येथे टपाल तिकिटांचे वन -फ्रेम प्रदर्शन आणि 'ऑलिम्पिक विश्वातील एक फिलाटेलिक प्रवास' या संकल्पनेवर चार फ्रेमचे प्रदर्शन आयोजित केले आहे.
हे फिलाटेली प्रदर्शन 11.08.2024 पर्यंत लोकांसाठी खुले राहील.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2037923)
Visitor Counter : 39